पैसे दुप्पट करणारी ही आहे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, अशी करा गुंतवणूक

पैसे दुप्पट करणारी ही आहे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, अशी करा गुंतवणूक

भारत बाँड ETF मध्ये गुंतवणूक सुरक्षीत असून त्याबद्दल खात्री बाळगा असं सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यातून मिळणारं उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे.

  • Share this:

मुंबई 18 डिसेंबर : देशात अर्थव्यवस्था घसरणीला लागलेली आहे. मार्केटमधला पैशाचा ओघ आटला आहे. नोकऱ्यांवर संक्रांत आलीय. बँकेत पैसे ठेवूनही त्याचं फारसं व्याज मिळत नाही. त्यामुळे पैसे गुंतवावे तरी कसे असा सगळ्यांना प्रश्न पडलाय. ज्यांना पैसे गुंतवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आता केंद्र सरकानं एक खास योजना आणलीय. या योजनेत पैसे गुंतवले की ते पैसे दुप्पट होणार आहेत. सरकारची ही योजना आहे भारत बाँड ईटीएफ (Bharat Bond ETF) गुंतवणूकदारांसाठी ही योजना खुली झाली असून त्याला प्रतिसादही उत्तम मिळतोय. हे बाँड घेण्यासाठी अनेक गुंतवणुकदारांनी उत्सुकता दाखवली असून या उत्तम प्रतिसाद मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे. या योजनेत जो पैसा जमा होणार आहे त्या पैशाची सरकार 'AAA' रेटिंग असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

भारत बाँड ईटीएफ (Bharat Bond ETF) मध्ये जर तुम्ही 1 लाखांची गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला 7.58 टक्के व्याज मिळणार आहे. त्यामुळे 10 वर्षात तुम्हाला एक लाखाचे 2,07,642 रुपये मिळणार आहेत.

भारत बाँड ETF मध्ये गुंतवणूक सुरक्षीत असून त्याबद्दल खात्री बाळगा असं सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यातून मिळणारं उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे. भारत बाँड ETFमध्ये तुम्ही कमीत कमी 1,000 रुपये आणि त्या पटीत गुंतवणूक करू शकता. यात गुंतवणूकदार 3 वर्ष ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात.

उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी, भाजपच्या आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण

GST चा असा होणार परिणाम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. GST वाढल्याने ज्या गोष्टी महाग होणार होत्या त्यावर उपाय काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. वस्तूंची विक्री वाढवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे आणि त्यासाठी वस्तू महाग होणार नाहीत यावर सरकारचा भर आहे. इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना निर्मला सीतारामन यांनी हे जाहीर केलं.

देशाची सुरक्षा तीन मित्रांच्या हातात, 44 वर्षांपूर्वी होते एकत्र

आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि GST ची कमी झालेली वसुली याबद्दलच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. मनरेगा आणि प्रधानमंत्री किसान योजना या योजनांना सरकारने पुष्टी दिली आहे. यामुळे ग्राहकांच्या हातात पैसा येईल. महाराष्ट्र, केरळ यासारख्या राज्यांनी GST ची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. राज्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही हे निर्मला सीतारामन यांनी मान्य केलं. पण करवसुली कमी झाल्यामुळे राज्यांना भरपाई देण्यात आलेली नाही, असं त्या म्हणाल्या.

Tags:
First Published: Dec 18, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading