'बंद'मध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार, Modi सरकारचा इशारा

'बंद'मध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार, Modi सरकारचा इशारा

खबरदार! भारत बंदमध्ये ( bharat bandh) सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना modi सरकारनं दिला इशारा

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी: देशातल्या मोठ्या कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी ( bharat bandh) 'बंद'ची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार (salary) कापला जाणार आहे. असा इशारा PM Modi सरकारनं दिला आहे. या बंदमुळे प्रामुख्याने बँकिंग क्षेत्र आणि वाहतुकीवर मोठी परिणाम होणार आहे. देशातल्या 10 मोठ्या कामगार संघटनांनी एकत्रितपणे बंदची हाक दिली आहे. 25 कोटी लोक या बंदमध्ये ( bharat bandh) सहभागी होतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे. जनतेविरोधातल्या धोरणांच्या निषेधार्थ भारत बंद ( bharat bandh) करत आहोत, असं या संघटनांनी एकत्रितरीत्या काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या आणि इतर स्थानिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

भारत बंदमध्ये ( bharat bandh) सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कापलं जाणार आहे. यासोबतच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. Department of Personnel and Training ने केंद्रीय कर्मचाऱ्य़ांना संपात सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. कर्मचारी गैरहजर राहिल्य़ास त्यांचं वेतन कापलं जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या कर्मचाऱ्याचा (salary) पगारासोबत भत्ताही (money) कापण्यात येणार असल्याची माहिती DoPT ने दिली आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर देशभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षाच्या कामगार संघटनांनी भारत 'बंद'चं आवाहन केलं आहे.

हेही वाचा-सुलेमानीच्या हत्येचा बदला! कसा झाला अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला, पाहा VIDEO

मुंबईकर चाकरमानी नेहमीप्रमाणे कुठल्याही संकटांना न घाबरत सकाळी कामावर निघतो तसच काहीसं चित्र आज सकाळीही पाहायला मिळालं आहे. चाकरमानी कामावर जायला निघाले आहेत ,विध्यार्थी शाळा कॉलेजसाठी निघालेले पाहायला मिळाले. मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल आणि बेस्ट बस सेवाही सुरळीत आहे. रस्त्यावरील बेस्ट बस तसेच रिक्षा ,टॅक्सी खासगी वाहन नेहमी प्रमाणे धावत आहेत. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नाये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कर्माचाऱ्यांच्या 12 विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभारातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढणार असल्यामुळे हा संप करत असल्याचं कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले.

2 जानेवारीला झालेल्या बैठकीत सरकारतर्फे कामगारांना कुठलंही ठोस आश्वासन न मिळाल्याने कामगार संघटनांनी भारत बंदची ( bharat bandh) हाक दिली. या बंदमध्ये देशभरातल्या काही महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनांनीही सहभागी व्हायचं ठरवलं आहे. JNU मध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ते( bharat bandh) बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा-'भारत बंद'चा परिणाम आणि आजच्या महत्त्वाच्या टॉप 5 बातम्या वाचा एका क्लिकवर

केंद्र सरकारच्या आर्थिक रणनितींच्या विरोधात देशभरात आज भारत बंद (Bharat Bandh 2020) ची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्य़े बँक कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. बंदमुळे नेटबँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाइन सुविधांना मात्र फरक जाणवणार आहे. बँकिंग सुधारणा, बँकांचे विलीनीकरण याचा निषेध म्हणून हा संप करण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीच्या प्रमुख मागणीचाही यात समावेश आहे. यासोबत 5 दिवसांचा आठवडा, नव्या कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती आणि त्यामुळे कामावर येणार ताण या सगळ्या मागण्यांसाठी बँकेतील कर्मचारी एक दिवसाच्या संपात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा-इराण-अमेरिका युद्धाच्या उंबरठ्यावर, तुमच्या खिशावर होणार परिणाम

Published by: Kranti Kanetkar
First published: January 8, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading