Home /News /money /

4 वाजेपर्यंत आजच करून घ्या बँकेचं काम, 'हे' आहे महत्त्वाचं कारण

4 वाजेपर्यंत आजच करून घ्या बँकेचं काम, 'हे' आहे महत्त्वाचं कारण

बँक कर्मचाऱ्यांचा 8 जानेवारीला देशव्यापी संप. आजच करून घ्या आर्थिक व्यवहार, संपामुळे उद्या राहणार बँक बंद.

    मुंबई, 07 जानेवारी: तुमची काही महत्त्वाची कामं असतील अतर आताच करून घ्या. कारण बुधवारी बँक बंद असणार आहे. बुधवारी संपूर्ण दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामध्ये बँकेचे वरिष्ठ अधिकारी मात्र सहभागी होणार नाही. पण बँकेचं कामकाज बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक रणनितींच्या विरोधात देशभरात येत्या 8 जानेवारी रोजी भारत बंद (Bharat Bandh 2020) ची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्य़े बँक कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. याचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात ATM सेवेवर होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. संपामुळे बुधवारी बँकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नेटबँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाइन सुविधांना मात्र फरक जाणवणार आहे. बँकिंग सुधारणा, बँकांचे विलीनीकरण याचा निषेध म्हणून हा संप करण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीच्या प्रमुख मागणीचाही यात समावेश आहे. यासोबत 5 दिवसांचा आठवडा, नव्या कर्मचाऱ्यांची रखडलेली भरती आणि त्यामुळे कामावर येणार ताण या सगळ्या मागण्यांसाठी बँकेतील कर्मचारी एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. मोदी सरकारचा नवा नियम, तुमच्या घरातला AC चालणार 24 डिग्रीवर तुमची महत्त्वाची काम असतील अथवा पैसे काढायचे असतील तर आजच ATMमधून पैसे काढून ठेवा. कारण उद्या बँकेतील आर्थिक व्यवहार बंद असल्यानं ATMवर ताण पडू शकतो. काहीवेळा सुट्टे पैसे किंवा एटीएममधील पैसे संपलेले असू शकतात. तीन महिन्यांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १० बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली.या विलीनीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात निकऱ्या कमी होतील अशी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्र सरकाच्य़ा आर्थिक धोरण आणि बदललेल्या नियमांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; इतिहासात पहिल्यादाच सोन्याने गाठली एवढी उंची
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या