Home /News /money /

सावधान! Income Tax च्या नावावर होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक; कोणत्याही SMS ला बळी पडू नका

सावधान! Income Tax च्या नावावर होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक; कोणत्याही SMS ला बळी पडू नका

कोणतीही माहिती न घेता एसएमएस किंवा ईमेलला रिप्लाय देणं महागात पडू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. इन्कम टॅक्स खात्याने आपल्या अधिकृत अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे.

  नवी दिल्ली, 20 मे:   डिजिटल व्यवहारांच्या (Digital Transactions) वाढत्या विस्तारासोबत फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. ई-मेल, एसएमएस किंवा आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही खोटे मेसेजेस (Fraud SMS, emails) पाठवून लोकांकडून पैसे लुटले जात आहेत. अशा खोट्या मेसेजेसना बळी पडू नका असं आवाहन आयकर खात्यानं केलं आहे. पॅन क्रमांक, आधार क्रमांक तसंच बँक खात्यांची माहिती अशी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असं आयकर खात्यानं स्पष्ट केलं आहे. कोणतीही माहिती न घेता एसएमएस किंवा ईमेलला रिप्लाय देणं महागात पडू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. इन्कम टॅक्स खात्याने आपल्या अधिकृत अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे. आयकर खात्याच्या (Income tax Department) नावानं खोटे मेसेजेस पाठविण्याचे, लॉटरीच्या स्कीमचे एसएमएस पाठविण्याचे प्रकार गेले काही दिवस सुरु होते. असे मेसेज पाठवून करदात्यांच्या (Tax Payers) किंवा इतर खातेदारांच्या खात्यांतून रक्कम चोरली जात होती. त्याबाबत आयकर खात्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अशा मेसेजेसना दाद देऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे. स्वतःची माहिती, आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती कोणालाही सांगू नये, तसंच कोणत्याही ईमेलची खातरजमा केल्याशिवाय त्यावर आपला खाते क्रमांक, पॅन क्रमांक अशी गोपनीय माहिती पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना आयकर खात्यानं नागरिकांना दिल्या आहेत. हे 11 स्टॉक्स सध्या आहेत Top वर, 3-4 आठवड्यात मिळू शकतो जबरदस्त परतावा!
  आयकर खात्याकडून अशा प्रकारची कोणतीही माहिती मागवली जात नसल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. सामान्यतः कर भरण्यासाठी तसंच परताव्यासाठी एसएमएस पाठवण्यात येतो; पण हॅकर ई-मेल किंवा एसएमएसमध्येही लिंक पाठवून माहिती मागवतात. त्यापासून सावध राहण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झाली आहे.
  काही दिवसांपूर्वी आयकर खात्यानं ‘पीआयबी फॅक्ट चेक’च्या (Press Information Bureau Fact Check) माध्यमातून ट्विट करून लोकांना लॉटरी स्कीमपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या होत्या. आयकर खात्याची अशी कोणतीही लकी ड्रॉ स्कीम नसून सोशल माध्यमांवर येणारे त्याबद्दलचे मेसेज खोटे असल्याचं म्हटलं होतं. फेब्रुवारी महिन्यातही आयकर खात्यानं डिपार्टमेंटमध्ये नोकरी देण्याच्या मेसेजेसबाबत सावध केलं होतं. आयकर खात्यात नोकरी मिळाल्याच्या खोट्या पत्रांबाबत इच्छुकांनी सावधगिरी बाळगावी. अशी पत्र पाठवणाऱ्यांच्या खोटेपणाला बळी पडू नका, असं ट्विट आयकर खात्यानं केलं होतं. HDFC बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! बॅंकेकडून FD व्याजदरांत वाढ तुम्ही मोठी रक्कम जिंकली आहे, असा संदेश पाठवला जातो. त्यावर विश्वास ठेवून काही जण त्याला प्रतिसाद देतात. मग लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी काही रक्कम देण्याची मागणी होते. अशाप्रकारे लुटीचे प्रकार घडतात. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपले आर्थिक व्यवहार, त्याबाबतची गोपनीय माहिती कोणासमोरही उघड न करणं, तशा कोणत्याही ई-मेल अथवा एसएमएसना प्रतिसाद न देणं हेच हिताचं असतं असंही इन्कम टॅक्स खात्यानं सुचवलं आहे.
  First published:

  Tags: Financial fraud, Income tax, Money

  पुढील बातम्या