Home /News /money /

'या' लार्जकॅप शेअरमध्ये पैसे गुंतवून मिळू शकतो चांगला परतावा; तज्ज्ञ काय सांगतात?

'या' लार्जकॅप शेअरमध्ये पैसे गुंतवून मिळू शकतो चांगला परतावा; तज्ज्ञ काय सांगतात?

यूएस ट्रेझरी उत्पन्नातील वाढ आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला. दरम्यान खालील 10 लार्जकॅप शेअर्सवर ब्रोकरेज हाऊस बुलिश आहेत.

    मुंबई, 22 जानेवारी : सलग चौथ्या दिवशी काल शेअर बाजारात (Share market) विक्रीचा दबाव दिसून आला. या 4 दिवसांत Sensex आणि Nifty जवळपास 4 टक्क्यांनी घसरले आहेत. 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्नातील वाढ आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला. दरम्यान खालील 10 लार्जकॅप शेअर्सवर ब्रोकरेज हाऊस बुलिश आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की या शेअर्समध्ये 32 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येईल. या शेअर्सवर एक नजर टाकूया. एचडीएफसी बँक (HDFC Bank) एचडीएफसी बँकेला बाय रेटिंग देताना, शेअरखानने (ShareKhan) 1973 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक 1509 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 30 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअरखानला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies) एचसीएल टेकला बाय रेटिंग देत ShareKhan ने 1550 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 1175 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 32 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअरखानला आहे. Cryptocurrency गुंतवणूकदारांचे 18 ट्रिलियन डॉलरचं नुकसान, Bitcoin ला देखील फटका बजाज फायनान्स (Bajaj Finance) या शेअरला बाय रेटिंग देत शेअरखानने 9,097 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 7531 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 20 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअरखानला आहे. टेक महिंद्रा (Tech Mahindra) टेक महिंद्राला बाय रेटिंग देताना, शेअरखानने 2060 रुपयांचे टॉर्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 1668 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 23 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअरखानला आहे. बेरोजगार, गरीबांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट खात्यात येतील पैसे अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement) अल्ट्राटेक सिमेंटला बाय रेटिंग देताना, शेअरखानने 9200 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 7454 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 23 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअरखानला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) टीसीएसला बाय रेटिंग देताना जिओजितने 4457 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3827 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 16 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे. इन्फोसिस (Infosys) Infosys ला बाय रेटिंग देत जिओजितने 2299 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 1824 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 26 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे. एशियन पेंट्स (Asian Paints) एशियन पेंट्सला बाय रेटिंग देताना, प्रभुदास लिल्लाधर यांनी 3,762 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3307 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 13 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे. बजाज ऑटो (Bajaj Auto) बजाज ऑटोला बाय रेटिंग देताना, प्रभुदास लिल्लाधर यांनी 3911 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3309 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 18 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअरखानला आहे. एचयूएल (HUL) मोतलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग देताना एचयूएलला 2750 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक 2261 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 21 टक्के परतावा मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या