मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Online Business; `या` व्यवसायातून घरबसल्या करा लाखोंची कमाई

Online Business; `या` व्यवसायातून घरबसल्या करा लाखोंची कमाई

Online Business

Online Business

कोरोना काळात व्यवसायासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करा. अनेक कंपन्या आपल्या जाहिरातीसाठी डिजिटल होर्डिंग आणि बॅनर बनवून घेतात. जर तुम्हाला संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

नवी दिल्ली : तुम्ही नोकरीला (Job) कंटाळला आहात, आयुष्यात अजून प्रगती करायची तुमची इच्छा आहे त्याचबरोबर तुमची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचा विचार करत आहात परंतु, काही कारणांनी पावलं पुढं टाकली जात नसतील तर आम्ही तुम्हाला एक आयडिया सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्नं प्रत्यक्षात आणू शकाल. जर पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही एखादा चांगला व्यवसाय (Business) सुरू करु शकत नसाल, तर आम्ही तुम्हाला एका नव्या व्यवसायाविषयी सांगत आहोत. या व्यवसायात तुम्ही नाममात्र गुंतवणूक करून दरमहा कोट्यवधी रुपये अगदी सहज कमवू शकता.

हा व्यवसाय आहे, ऑनलाइन होर्डिंगचा (Online Hoarding). हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नाही. अगदी घरबसल्या, एखाद्या खोलीमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. कोरोनाकाळानंतर ऑनलाइन व्यवसायांच्या (Online Business) संकल्पना वेगाने वाढत आहेत. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी चांगला फायदेशीर ठरू शकतो.

`न्यूज 18` ने आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग कंपनी `गो होर्डिंग डॉट कॉम`च्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की त्या या व्यवसायातून दरमहा 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करत आहेत. शर्मा यांनी 2016 मध्ये 50,000 रुपयांची गुंतवणूक करत ऑनलाइन होर्डिंग व्यवसाय सुरू केला. दुसऱ्या वर्षी दीप्ती यांची कमाई 12 कोटींवर पोहोचली. एका वर्षात कंपनीची उलाढाल 20 कोटींपेक्षा जास्त झाली.

असा सुरू करा व्यवसाय

जर तुम्हाला ग्राफिक्स (Graphics), डिझायनिंग (Designing) आणि कॉम्प्युटरचं चांगलं ज्ञान असेल तर तुम्ही घरबसल्या डिजिटल होर्डिंग (Digital Hoarding) म्हणजेच ऑनलाइन होर्डिंग तयार करण्याचं काम सुरू करू शकता.

सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही फ्री लान्सिंग डॉट कॉम आणि `अपवर्क`सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online Platform) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साइटसवर तुमचं स्किल दाखवून ऑर्डर मिळवू शकता. यासाठी या पोर्टलवर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.

याशिवाय तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवरून डिजीटल होर्डिंगची माहिती देत ऑनलाइन ऑर्डर मिळवू शकता. दररोज लोकांना घरबसल्या जाहिरात द्यायची गरज भासत असल्यानं हा व्यवसाय झपाट्यानं वाढत आहे.

शर्मा यांनी सांगितलं की `आमची कंपनी एक महिन्याकरिता होर्डिंग लावण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये आकारते. दिल्ली, मुंबईसारख्या हाय प्रोफाईल लोकेशनवर एक होर्डिंग दीर्घकाळ लावण्यासाठी 10 लाखांपर्यंत रक्कम मिळू शकते. अशा स्थितीत जर तुम्हाला एका महिन्यात 10 होर्डिंग्जच्या ऑर्डर मिळाल्या तरी तुम्ही 1 कोटींपर्यंत कमाई करु शकता. सणासुदीच्या काळात अनेकदा महिनाभर 10 ते 12 होर्डिंग्जच्या देखील ऑर्डर मिळतात. त्यामुळे या व्यवसायातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.`

जाणून घ्या कंपनीची कार्यपद्धती...

सर्व प्रथम, ग्राहकांना गो होर्डिंग्ज डॉट कॉमच्या वेबसाइटवर लॉग इन करावं लागेल. यानंतर, वेबसाइटवर जाऊन आपल्याला ज्याठिकाणी होर्डिंग्ज लावायचं आहे, ते स्थान निवडावं लागेल. स्थान निवडल्यानंतर, कंपनीला एक मेल जातो. त्यानंतर कंपनी वेबसाइटच्या माध्यमातून संबंधित स्थान उपलब्ध आहे का? याची पुष्टी करून ग्राहकांना माहिती देते. यानंतर ग्राहकांकडून आर्टवर्क आणि ऑर्डर घेतली जाते. संबंधित ठिकाणी लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी वेबसाइटकडून एक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. अशा पद्धतीनं हॉर्डिंग्ज लावण्यासाठी कंपनीकडून महिन्याला एक लाख रुपये शुल्क आकारले जाते.

First published:

Tags: Business, Business News, Job, Money, Online