मुंबई, 11 मे : जास्त करून लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला घाबरतात. आपले पैसे बुडतील असं त्यांना वाटतं. पण देशातल्या तिसऱ्या श्रीमंत व्यक्तीनं वारेन बफेनं शेअर बाजारात पैसे गुंतवायच्या काही टिप्स दिल्यात. बफे शेअर बाजाराचे मोठे खिलाडी मानले जातात. त्यांनी सांगितलेल्या गुंतवणुकीच्या टिप्समुळे तुम्हीही बनू शकता श्रीमंत.
वारेन बफे यांनी वयाच्या 11व्या वर्षी पहिला शेअर खरेदी केला होता. 1942ची ती पहिली तिमाही होती. त्यावेळी पर्ल हार्बरची घटना घडली होती. ते सांगतात, मी एक शेअर 114.75 डाॅलर ( आजच्या हिशेबानं 8 हजार रुपये ) लावले होते. ती रक्कम मी एसअँडपी 500 मध्ये लावले असते आणि त्यावर मिळालेल्या डिव्हिडंडला त्याच शेअरमध्ये गुंतवलं असतं तर विचार करा किती रक्कम झाली असती?
ट्रेनीपासून सुरुवात करून उभा केला 3 लाख कोटींचा उद्योग; देशातला हा बडा उद्योजक पडद्याआड
8 हजार रुपयांचे असे होतात 2.80 कोटी रुपये
वारेन बफे म्हणतात, मी कमी वयात 114 डाॅलर्स एसअँडपी 500मध्ये लावले असते तर आज 4 लाख डाॅलर झाले असते.
जास्त काळातली गुंतवणूक विचारपूर्वक करा
ते सांगतात, झाडाची सावली हवी तर अनेक वर्ष आधी झाडं लावलं पाहिजे. दूरवरचा विचार करूनच गुंतवणूक करावी लागते. संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत. जेव्हा सोन्याचा पाऊस पडतो, तेव्हा हात पुढे नाही करायचे बादली आणायची. संधीकडे लक्ष ठेवा. जी कधीही मिळू शकते. कुठल्याही इंडस्ट्रीत मिळू शकते.
आधार अपडेट करायचे दर बदललेत, जाणून घ्या किती पडतील पैसे
दुसऱ्यांना पाहून बाजारात पैसे लावू नका
गुंतवणूक केल्यानंतर सारखं शेअर बाजाराच्या किंमतींकडे पाहणं चुकीचं आहे. बाजार वधारणं किंवा घसरण पाहून खरेदी किंवा विक्री करणं यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही एखाद्या शेअरला दहा वर्ष ठेवू शकत नसाल तर त्याला 10 मिनिटंही ठेवायचा विचार करू नका. तुम्हाला कळतं तेव्हाच गुंतवणूक करा.
अशा जागी गुंतवणूक करा,जिथे फायदा आहे
जेव्हा बाजारात लोक लोभी बनतात तेव्हा तुम्ही भित्रे व्हा, लोक घाबरत असतील तर तुम्ही लोभी बना. सोबत असा मॅनेजर ठेवा जो तुमच्या हिताचा विचार करेल. अशी गुंतवणूक करा जी आयुष्यभर नफा देईल.
'या' म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं आहे धोकादायक,अशी घ्यावी काळजी
पोर्टफोलिओत वैविध्य ठेवा
अनेक कंपन्यात पैसे गुंतवलेत तर धोका कमी असतो. तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार बनाल.
संयम ठेवलात तर पैसे वाढतील
जास्त रिटर्नचा लोभ ठेवू नका. 15 ते 20 टक्के रिटर्न मिळत असेल तर पैसे गुंतवा. बाजारात गुंतवणूक केली असेल तर संयम ठेवणं आवश्यक आहे.
VIDEO: अंधेरी स्टेशनमध्ये अवंतिका एक्सप्रेस अंगावरून धावल्यानंतरही 'तो' सहीसलामत!