नवी दिल्ली 08 मे : देशातील दुसर्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं अर्थात पीएनबीनं (PNB) ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) एक विशेष योजना जाहीर केली आहे. पीएनबीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारी पाठबळ असणाऱ्या अनेक योजना उपलब्ध केल्या आहेत. त्याद्वारे ज्येष्ठ नागरिक चांगला परतावा मिळवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पीएनबी ज्येष्ठ नागरिक योजना (PNB Senior Citizen Scheme). सेवानिवृत्त लोकांना (Retired Persons) या योजनेचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो. व्याजदर (Interest Rate) हे या योजनेचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. याचा व्याजदर 7.4 टक्के असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या बचतीवर चांगले व्याज मिळते.
सर्वोत्तम व्याजदर :
दर तिमाहीपूर्वी सरकार ज्येष्ठ नागरिक बचत योजनांसाठी व्याजदर जाहीर करते. त्यानुसार सध्या पंजाब नॅशनल बँक या योजनेतील ठेवींवर 7.4 टक्के व्याज देत आहे
नियम आणि अटी :
- या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते, तर कमाल मर्यादा 15 लाख रुपये आहे. ठेवीदार या योजनेंतर्गत एका हजाराच्या पटीत गुंतवणूक करु शकतात.
- योजनेची मुदत 5 वर्षे असून मुदतपूर्तीनंतर ती पुन्हा 3 वर्षे वाढवता येऊ शकते.
- मुदतीनंतर संयुक्त बचत खात्यात जमा झालेली रक्कम ज्या व्यक्तीचे नाव पहिले आहे त्याला मिळू शकते.
- एकापेक्षा अधिक व्यक्तींचं नामनिर्देशन (Nomination) करण्याची सोय या योजनेत आहे.
- ठेवीदारचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
- एखादयानं व्हीआरएस घेतली असेल आणि त्याचं वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- संरक्षण सेवेतील व्यक्तींसाठी वयाची अट शिथिलक्षम आहे. सैन्यातील कर्मचारी 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या काळातही या योजनेत पैसे गुंतवू शकतात.
- एयूएफ, एनआरआय, पीआयओ, सिव्हिल पर्सनल ऑफ डिफेन्स सर्व्हिसेसशी संबंधित लोक पीएनबी ज्येष्ठ नागरिक योजनेत पैसे जमा करू शकत नाहीत.
ही कागदपत्रे आवश्यक :
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ओळखपत्रासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड द्यावे लागेल. अॅड्रेस प्रूफसाठी टेलिफोन बिल, आधार कार्ड लागेल. वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, मतदार ओळखपत्र चालते. पासपोर्ट आकाराचे दोन फोटोही आवश्यक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Pnb bank, Saving bank account