22 वर्षांपासून 'अशी' गुंतवणूक केलीत तर 42व्या वर्षी मिळतील 5 कोटी रुपये

22 वर्षांपासून 'अशी' गुंतवणूक केलीत तर 42व्या वर्षी मिळतील 5 कोटी रुपये

शिक्षण, आरोग्य, घर सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होतायत. पण तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुमचं आयुष्य निवांत जाऊ शकतं.

  • Share this:

मुंबई, 01 मे : भविष्याची चिंता प्रत्येकालाच सतावत असते. आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतं. शिक्षण, आरोग्य, घर सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होतायत. पण तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुमचं आयुष्य निवांत जाऊ शकतं.

कमी वयात सुरू करा गुंतवणूक

भविष्यात मोठी रक्कम जमवण्यासाठी तुम्ही लवकर गुंतवणूक सुरू करा.  तुम्ही 21-22 वर्षातच पुढच्या 20 वर्षाचं प्लॅनिंग करा. तुम्ही व्यवस्थित गुंतवणूक केलीत तर 42 वर्षापर्यंत तुमच्याकडे भरघोस रक्कम असू शकते.

SIP आहे योग्य गुंतवणूक

स्टाॅक मार्केटमध्ये चढउतार सुरू असतात. अशा वेळी SIP हा एक चांगला पर्याय आहे. दर महिन्याला तुमच्या बँकेतून पैसे जातील. पण म्युच्युअल फंडात 12 ते 15 टक्के रिटर्न मिळू शकतं.

रिटर्नवर अवलंबून असते गुंतवणूक

20 वर्षांत तुम्ही दर महिन्याला 33 हजार रुपये गुंतवलेत आणि 15 टक्के रिटर्न मिळाले तर 20 वर्षांत 5 कोटी रुपये जमा होऊ शकतात. जर रिटर्न 12 टक्के असतील तर दर महिन्याला 50 हजार रुपये गुंतवावे लागतील.

दोन-तीन म्युच्युअल फंड निवडा

दोन किंवा तीन म्युच्युअल फंडाचीच निवड करा. तुमचा पोर्टफोलिओ मर्यादित ठेवलात तर त्याचं व्यवस्थापन चांगलं जमू शकतं. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

कमी वयात इन्शुरन्स पाॅलिसी

21-22 वयात इन्शुरन्स पाॅलिसी घेणं चांगलं. या वयात कमी प्रीमियमम लागतो.  कमी प्रीमियमवर पाॅलिसी घेता येते. 30व्या वर्षी तुम्ही 5 लाख रुपयांची पाॅलिसी घेतलीत तर वर्षाला 15 हजार रुपये भरावे लागतील. कंपन्यांनाही तुम्हाला जास्त रकमेचा इन्शुरन्स देणं सोपं जातं.

घर घेण्याचा निर्णय

तुम्ही लवकर घर घेण्याचा निर्णय घेतलात, तर बँकेकडून कर्ज मिळणंही सोपं होईल. कर्ज चुकवण्यासाठी तुमच्याकडे बराच वेळही असतो. पुन्हा 5 ते 10 वर्षांनी घर विकलंत तर चांगला परतावा मिळू शकतो.

VIDEO: नक्षलवाद्यांचा पुन्हा भ्याड हल्ला, 15 जवान शहीद

First published: May 1, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading