रोज 40 रुपयांची बचत तुम्हाला मिळवून देईल 8 लाख रुपये!

रोज 40 रुपयांची बचत तुम्हाला मिळवून देईल 8 लाख रुपये!

तुम्ही कोणती मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ह्या स्कीमचा जरूर विचार करा. दुप्पट फायदा मिळवून देणारी ही स्कीम कोणती वाचा सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर: तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा भविष्यात चांगले रिटर्न मिळवण्यासाठी गुंतवणुकीच्या विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही हा खास प्लॅन असू शकतो. ही कमी पैशांची गुंतवणूक करून तुम्हाला जास्त नफा कमवता येईल असा एक प्लॅन सध्या बाजारात आहे. ह्या प्लॅनची माहिती घेऊन तुम्हीही लगेच गुंतवणूक करू शकता. तुम्ही रोज 40 रुपये खर्च न करता ते साठवून लाखो रुपये कमवू शकता. हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल तर पाहा कसा आहे इन्वेस्ट प्लॅन.

तुमचा सगळा खर्च सांभाळून तुम्हाला दरदिवशी फक्त 40 रुपये बचत करायची आहे. हे 40 रुपये तुम्ही म्युचअस फंडमध्ये सिस्टीमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन ज्याला SIP म्हणतात तिथे गुंतवायचे. आता रोज 40 रुपयांची SIP तुम्हाला 8 लाख कशी मिळवून देणार पाहा.

वाचा-सावधान! 31 डिसेंबरपासून बंद होणार 2 हजारांची नोट? जाणून घ्या काय आहे सत्य

तुम्ही रोज 40 रुपयांची बचत करता म्हणजे महिन्याला तुमच्याकडे 1200 रुपये जमा होतील. आता 1200 गुणीले 12 केलं तर 14 हजार 400 रुपये वर्षाला होतील. तुम्ही 1 हजार 200 रुपये दर महिना म्युचअल फंडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवायचे. असं तुम्हाला 15 वर्ष करावं लागेल. त्यासोबत मार्केट रिस्कचाही विचार केला तर तुम्हाला 15 वर्षांनंतर 8 लाख रुपये मिळू शकतात. कोणत्या म्युचअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे हे मार्केट रिस्क आणि तज्ज्ञांचा सल्ला यावर अवलंबून आहे. शेअर मार्केट सातत्यानं बदलत असल्यानं त्यावर एसआयपीचा व्याजदर अवलंबून असतो.

म्युचअल फंड रिटर्नचा विचार केला तर काही चांगल्या स्कीम ज्या 15 वर्षात चांगलं रिर्टन देतात अशा स्कीमची निवड करा. यासाठी योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आदित्य बिर्ला, सन लाइफ, इक्विटी फंड, 15 वर्षात 15.20 टक्के पैसे रिटर्न देतात. तसंच डीएसपी इक्विटी ऑपर्चुनिटी फंड 14.67 टक्क्यानं पैसे रिटर्न देतात. म्युचअल फंडमध्ये तुम्ही जेवढी कमी वर्षांसाठी गुंतवणूक कराल तर तुम्हाला तोटा होईल मात्र जास्त वर्षांसाठी गुंतवणूक केलीत तर नफा जास्त मिळण्याची शक्यता आहे.

वाचा-रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा

तुम्ही जर म्युचअल फंडच्या स्कीममध्ये 15 वर्षांसाठी रिनवेस्ट केलं तर तुमच्याजवळ वर्षाकाठी 2 लाख 16 हजार रुपये होतात. तेच पैसे तुम्ही 15 वर्ष एसआयपीमध्ये गुंतवलेत तर 8 लाख दोन हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळतात. तुमचा 5,86,208 रुपयांचा नफा SIP मधून होतो.

(टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

Published by: Kranti Kanetkar
First published: December 9, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading