काॅलेज विद्यार्थ्यांना एका मिनिटात 'इथे' मिळेल कर्जापासून ते नोट्सपर्यंत सर्व काही

काॅलेज विद्यार्थ्यांना एका मिनिटात 'इथे' मिळेल कर्जापासून ते नोट्सपर्यंत सर्व काही

Apps, College Student - काॅलेज विद्यार्थ्यांचं आयुष्य सोपं करणारे काही अ‍ॅप्स

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : शाळा संपली की काॅलेज सुरू होतं. काॅलेज लाइफ एंजाॅय करण्याची इच्छा असते. पण ते तितकं सोपं नाही. अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. अगदी पैसे, खाणं-पिणं, अभ्यास इत्यादी गोष्टींसाठी बरंच काही लागतं. महत्त्वाचं म्हणजे पैसे. अनेकदा घरून मिळणारा पाॅकेटमनी पुरेसा नसतो. अशा वेळी पर्सनल लोन मिळण्याचंही अ‍ॅप आहे. काॅलेज विद्यार्थ्यांसाठी ते खूप उपयोगी पडू शकतं. इतरही तुमच्या उपयोगी अ‍ॅपबद्दल जाणून घेऊ.

mPokket - इथे तुम्हाला कुठल्याही अडचणीशिवाय पर्सनल लोन मिळू शकतं. इथे कर्जासाठी काही कागदपत्र लागत नाहीत. भारतातला विद्यार्थी या अ‍ॅपवर ताबडतोब कर्ज घेऊ शकतो.

पेट्रोलच्या दरातली घसरण सुरूच, 'हे' आहेत आजचे दर

Alarmy - हा एक अलार्म अ‍ॅप आहे. हा अ‍ॅप वापरत असाल तर अलार्म बंद करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोटो क्लिक करावा लागेल किंवा फोन हलवावा लागेल. असं करावं लागल्यानं युजर जागा होतो. एरवी अनेक जण अलार्म वाजला तर तो झोपेतच बंद करून पुन्हा झोपी जातात.

LIC मध्ये नोकरी करण्याची संधी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

Ridlr - यात विद्यार्थ्यांना बस, मेट्रो आणि ट्रेनची माहिती मिळेल. शिवाय यापैकी काही रद्द झालं किंवा लेट असेल तरीही ती माहिती मिळते. या अ‍ॅपवर ट्रान्सपोर्टचे इतर पर्यायही मिळतात.

Dropbox - या अ‍ॅपमध्ये तुम्ही नोट्स आणि अभ्यासाचं सर्व काही एकत्र ठेवू शकता. म्हणजे ते डिलिट होण्याची भीती राहात नाही. ते कायमस्वरूपी राहतं.

सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही झाली महाग, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Swiggy/Zomato - अनेक विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी जातात. त्यावेळी खाण्या-पिण्याचे प्रश्न निर्माण होतात. त्यांच्यासाठी ही अ‍ॅप्स महत्त्वाची आहेत. यात तुम्ही कुठूनही खाणं ऑर्डर करू शकता.

VIDEO: घर बुडाल्यानंतर शाळेत ठेवलं गरोदर महिलेला, 3 दिवसानंतर मदत न मिळाल्यामुळे पुरग्रस्त संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: apps
First Published: Aug 9, 2019 12:39 PM IST

ताज्या बातम्या