इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे 'हे' आहेत फायदे

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे 'हे' आहेत फायदे

तज्ज्ञांच्या मते सगळ्यांनीच इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR भरायला हवं. पाहा त्याचे फायदे

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : इन्कम टॅक्स भरायला प्रत्येक जणच घाबरत असतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की इन्कम टॅक्स भरायचे अनेक फायदे आहेत. खरं तर 2.5 लाख रुपयांवर कर लागत नाही. पण तरीही तज्ज्ञांच्या मते सगळ्यांनीच इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR भरायला हवं. पाहा त्याचे फायदे-

1. कर्ज आणि विसा मिळण्याचे फायदे

तुम्ही कर्ज घेण्यासाठी योग्य आहात की नाही हे तुमच्या कमाईवरून नक्की होतं. ते तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नवरून कळतं. अनेक संस्था ITR मध्ये दिलेल्या माहितीनुसार कर्ज आणि विसा देण्याचा निर्णय घेतात.

2. जास्त विमा कव्हरेज मिळेल

तुम्ही 1 कोटी विमा कव्हरेज घेणार असाल तर विमा कंपनी तुमच्याकडून ITRची मागणी करेल. तुमच्या कमाईचं स्रोत जाणून घेण्यासाठी ITRवर भरवसा केला जातो.

3. मोठ्या देवाण-घेवाणीसाठी

तुम्हाला पैशाची देवाण घेवाण करायची असेल, तर ITR गरजेचं असतं. संपत्ती खरेदी करणं, विकणं, बँकेत मोठी रक्कम जमा करणं, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं यासाठी ITR लागतो. अशा वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून धोका नसतो.

4. खरेदी-विक्रीसाठी गरजेचं

तुम्हाला एखादी वस्तू सरकारी कंपन्यांना विकायची असेल, तर ITR भरणं गरजेचं आहे. ITR तुम्हाला व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देतं.

यांना ITR भरण्याची गरज नाही

60 वर्षांहून जास्त आणि 80 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आणि 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचं उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर त्यांना ITR भरायची गरज नाही.

शिर्डी विमानतळावर विमान घसरल्याचा पहिला VIDEO

First published: April 29, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading