• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • पुढील वर्ष नोकरदारांसाठी फायद्याचं, इतकी होणार पगारवाढ? जाणून घ्या सविस्तर...

पुढील वर्ष नोकरदारांसाठी फायद्याचं, इतकी होणार पगारवाढ? जाणून घ्या सविस्तर...

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला.

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोनाच्या जागतिक साथीनंतर लागू कराव्या लागलेल्या लॉकडाउनमुळे जगभरच मंदीसदृश परिस्थिती होती. आर्थिक विकास मंदावला होता. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले. आहे त्याच पगारात कपात होत असल्यामुळे पगारवाढीचा प्रश्नच नव्हता. आता कोरोना संसर्ग आटोक्यात येऊ लागला आहे, तसतशी आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. 2022 साली कोणत्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ (Salary Hike) मिळू शकते, तसंच पगारवाढीचं प्रमाण किती असू शकतं याचा अंदाज नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात घेण्यात आला. दी डेलॉइट वर्कफोर्स (The Deloitte Workforce) आणि इन्क्रिमेंट ट्रेंड्स (Increment Trends) यांनी हे सर्वेक्षण केलं होतं. पुढील वर्षी सरासरी 8.6 टक्के एवढी पगारवाढ कर्मचाऱ्यांना मिळेल, असा प्राथमिक अंदाज या सर्वेक्षणानुसार वर्तवण्यात आला आहे. तसं जर खरंच झालं, तर 2022मधलं पगारवाढीचं प्रमाण कोरोनापूर्व काळाइतकं म्हणजे 2019 सालाइतकं होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य; चिमुकल्यांच्या कपड्यांवर छापले भारतविरोधी मेसेज सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी सुमारे 25 टक्के कंपन्या पुढील वर्षी देणार असलेली पगारवाढीची टक्केवारी दोन आकडी आहे, असं त्या अहवालात म्हटलं आहे. तसंच, अहवालात असंही दिसून आलं आहे की, 92 टक्के कंपन्यांनी 2021मध्ये सरासरी 8 टक्के पगारवाढ दिली आहे. 2020 साली म्हणजे जेव्हा कोरोनाची पातळी सर्वोच्च होती, तेव्हा केवळ 60 टक्के कंपन्यांनीच आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली होती आणि ती पगारवाढही सुमारे 4.4 टक्के एवढीच होती. 'डेलॉइट टच तोहमात्सू इंडिया एलएलपी'चे (Deloitte Touche Tohmatsu India LLP) भागीदार आनंदोरूप घोष यांनी सांगितलं, '2021च्या तुलनेत बहुतांश कंपन्या 2022मध्ये मोठ्या प्रमाणावर पगारवाढ देणार असल्या, तरी कोविड-19मुळे आलेलं सावट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळे अनिश्चिततेचं वातावरण कायम असून, पुढचा अंदाज बांधणं कंपन्यांना अवघड जात आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या काही कंपन्यांनी 2021च्या पगारवाढीशी संदर्भातलं काम अलीकडेच हातावेगळं केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी 2022ची पगारवाढ हा मुद्दा अद्याप बराच दूर आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर 2021-22 या आर्थिक वर्षातल्या जीडीपीचा अंदाज घटवण्यात आला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून त्या अनुषंगाने पावलं उचलली जाऊ शकतात.' माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या (IT Sector) कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये सर्वाधिक पगारवाढ मिळेल, असा अंदाज आहे. तसंच, त्या खालोखाल लाइफ सायन्सेस अर्थात जैविक शास्त्रांशी निगडित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल, असा अंदाज आहे. केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्याच्या पगारवाढीची टक्केवारी दोन आकडी असून, सर्वाधिक पगारवाढ डिजिटल किंवा ई-कॉमर्स कंपन्या देणार आहेत. त्याउलट, रिटेल सेक्टर, हॉस्पिटॅलिटी, रेस्तराँ, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट कंपन्यांकडून कमी पगारवाढीचा ट्रेंड कायम राहणार आहे. यात हेही लक्षात घ्यायला पाहिजे, की संबंधित क्षेत्रातल्या सर्वच कर्मचाऱ्यांना सारखीच पगारवाढ मिळणार नाही. कौशल्य आणि कामगिरीच्या आधारे प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळी पगारवाढ दिली जाईल, असं कंपन्यांनी सर्वेक्षणात दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. त्यामुळे सर्वसाधारण काम असलेल्या कर्मचाऱ्याला जेवढी पगारवाढ मिळेल, त्या तुलनेत उत्तम कामगिरी असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी पगारवाढ 1.8 पटीपर्यंत जास्त असू शकते. Bigg Boss Marathi 3 : जय आणि मीनलमध्ये जेवणाच्या टेबलावर तुफान राडा 'डेलॉइट टच तोहमात्सू इंडिया एलएलपी'चे भागीदार अनुभव गुप्ता म्हणाले, 'कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचं संतुलन सांभाळतानाच कर्मचाऱ्यांनाही जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल, याचा विचारही कंपन्या करत आहेत. कारण अनेकांसाठी ही दोन वर्षं खूपच कठीण गेली आहेत. जी क्षेत्रं अद्याप सावरलेली नाही, त्या क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनीही 2021मध्ये कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून पगारवाढ दिली आहे. कामाच्या प्रकारानुसार पगारवाढीचा प्रकार आता अधिक रूढ होऊ शकतो.' 2021मध्ये सुमारे 12 टक्के कर्मचाऱ्यांचं प्रमोशन (Promotion) झालं. हे प्रमाण 2020च्या तुलनेत 10 टक्के कमी होतं. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम बदलत असल्याने सुमारे 12 टक्के कंपन्यांनी त्यांचे बोनस किंवा व्हॅरिएब पे प्लॅन्स रिवॉर्ड स्ट्रक्चरशी संलग्न केले आहेत. 78 टक्के कंपन्यांनी असं सांगितलं, की त्यांनी कोरोनापूर्व काळाच्या वेगाने नव्या भरतीला सुरुवात केली आहे.
  First published: