मराठी बातम्या /बातम्या /मनी /

बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान सामान ठेवायचं आहे? त्याआधी नियम समजून घ्या

बँकेच्या लॉकरमध्ये मौल्यवान सामान ठेवायचं आहे? त्याआधी नियम समजून घ्या

Bank Locker Rule: अनेकदा बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास संबंधित बँकेच्या वतीने ग्राहकाला लॉकरच्या 100 पटीने भरपाई दिली जाईल.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 10 ऑगस्ट : बँक ग्राहकांची सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वेळोवेळी नियम बदलले जातात. आरबीआयने बँक लॉकरशी संबंधित नियम बदलले आहेत. मौल्यवान वस्तू, कागदपत्र, दागिने घरात ठेवण्यापेक्षा बँक लॉकरमध्ये अनेकजण ठेवतात. जेणेकरुन चोरीचा धोका कमी होतो. तुम्हीही कोणत्याही बँकेत लॉकर घेतले असेल आणि त्यात तुमची मौल्यवान वस्तू ठेवली असेल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल. अनेकदा बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास संबंधित बँकेच्या वतीने ग्राहकाला लॉकरच्या 100 पटीने भरपाई दिली जाईल. आतापर्यंत बँका चोरीच्या घटनेकडे दुर्लक्ष करत होत्या आणि त्याला जबाबदार नसल्याचे सांगत होत्या. आरबीआयने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की बँकांना रिकाम्या लॉकरची यादी, लॉकरसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करावा लागेल. यामुळे लॉकर सिस्टिममध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. बँका ग्राहकांना अंधारात ठेवू शकत नाहीत, असे आरबीआयचे मत आहे. त्यांना योग्य माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महाग; सोनं आजही उच्चांकी किमतीपेक्षा 3900 रुपयांनी स्वस्त आता जेव्हाही तुम्ही लॉकरमध्ये प्रवेश कराल, तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट केले जाईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हा नियम आरबीआयने बनवला आहे. तसेच बँकांना लॉकर जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी भाड्याने देण्याचा अधिकार आहे. लॉकरचे भाडे 2000 रुपये असल्यास, इतर देखभाल शुल्क वगळून बँक तुमच्याकडून 6000 रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाही. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता घरबसल्या अ‍ॅपद्वारे तपासा, तुमच्या मोबाईलमध्ये आहे का 'हे' अ‍ॅप? सीसीटीव्ही फुटेज आवश्यक आता लॉकर रूममध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजचा डेटा 180 दिवसांसाठी स्टोअर करावा लागणार आहे. चोरी किंवा सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळल्यास पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करू शकणार आहेत.
First published:

Tags: Bank services, Rbi

पुढील बातम्या