• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली; काय आहेत नवे दर?

Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही महागली; काय आहेत नवे दर?

सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 256 रुपयांनी वाढला. तर चांदीची किंमत आज 188 रुपयांनी वाढली.

  • Share this:
    मुंबई, 19 ऑक्टोबर : सणासुदीनिमित्त अथवा लग्न सोहळ्यासाठी सोनं खरेदी (Gold Buy) करायचा विचार असेल तर लवकर तयारी करा. कारण सोन्याच्या भावात (Gold Price Today) वाढ होताना दिसत आहे. दिवाळीपूर्वी (Diwali Festival) मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सणासुदीच्या काळात, भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोनं प्रति 10 ग्रॅम 46 हजार 324 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 62 हजार 140 रुपये प्रति  किलोवर (Silver Price Today) बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचे भाव वाढले, तर चांदीच्या किंमतीत काहीशी वाढ झाली. काय आहेत सोन्याचे नवीन दर? दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 256 रुपयांनी वाढले. यासह राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 46 हजार 580 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी अजूनही आहे कारण त्याची सध्याची किंमत विक्रमी उच्चांकापेक्षा कमी आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं होतं. कागद नाही तर या पदार्थापासून तयार होतात नोटा; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य! चांदी खरेदीसाठी नवी किंमत? चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळाली. चांदीची किंमत आज 188 रुपयांनी वाढली. यासह चांदीचे नवे दर 62 हजार 328 रुपये प्रति किलो आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात फार काही बदल जाणवले नाहीत. Petrol Price Today: ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 14 वेळा इंधन दरवाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव सोन्याच्या किंमत वाढण्याचं कारण काय? एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Security) सिनियर अॅनालिस्ट (Commodities) तपन पटेल यांनी म्हटलं की, डॉलरची मजबूत स्थिती आणि जागतिक बाजाराकडून मिळालेल्या संकेतांमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. त्यांनी सांगितले की आज कॉमेक्सवरील सोन्याच्या किमतीत 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर, अमेरिकन बॉण्ड यील्डमध्ये घट झाल्याचा परिणामही सोन्याच्या किमती वाढल्याच्या रूपात दिसून आला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published: