Home /News /money /

Property Tips: घर खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची कागदपत्रं नीट तपासा; फसवणूक होण्यापेक्षा सावध राहा

Property Tips: घर खरेदी करण्यापूर्वी 'ही' महत्त्वाची कागदपत्रं नीट तपासा; फसवणूक होण्यापेक्षा सावध राहा

देशातील विविध न्यायालयांमध्ये घर-प्रॉपर्टी संबंधी फसवणुकीची किंवा अडचणींची तब्बल साडेचार कोटी प्रकरणं सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करताना जर फसवणूक टाळायची (Tips to avoid property fraud) असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रं तपासणं गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 15 एप्रिल : आपल्या मालकीचं एखादं टुमदार घर असावं अशी इच्छा सर्वांचीच असते. आपलं स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी लोक आयुष्यभर राबतात. अगदी छोटं घर जरी बांधायचं झालं, तरी जमिनीच्या किंमतीसह बांधकामाचा खर्च पकडल्यास कित्येकांची आयुष्यभराचं सेव्हिंग त्यातच निघून जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना त्यात रिस्कही (Property buying risk) तेवढीच असते. त्यामुळे घर किंवा घरासाठी जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती (Property buying tips) देणार आहोत. झी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. प्रॉपर्टी घेताना तपासा ही कागदपत्रं एका आकडेवारीनुसार, देशातील विविध न्यायालयांमध्ये घर-प्रॉपर्टी संबंधी फसवणुकीची किंवा अडचणींची तब्बल साडेचार कोटी प्रकरणं सुरू आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करताना जर फसवणूक टाळायची (Tips to avoid property fraud) असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रं तपासणं गरजेचं आहे. यामध्ये कमेन्समेंट सर्टिफिकेट, इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट अशा कागदपत्रांचा (Check these documents before buying property) समावेश होतो. या डॉक्युमेंट्सचं काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊ. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Pension Scheme: दरमाह गुंतवणूक करुन भविष्यात चिंतामुक्त व्हा; निवृत्तीनंतरही मिळेल 50 हजारांची पेन्शन ऑक्युपन्सी सर्टिफिकेट तुम्ही जर एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेत असाल, तर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (Occupancy Certificate) म्हणजेच ओसी प्रमाणपत्र तपासणं गरजेचं आहे. एखादा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून हे सर्टिफिकेट देण्यात येतं. तयार इमारत ही संपूर्णपणे कायदेशीर आहे हे या प्रमाणापत्रामुळे (What is Occupancy certificate) स्पष्ट होतं. तसंच त्या ठिकाणी पाणी, सांडपाणी आणि वीज कनेक्शन पुरवण्यात आलं आहे की नाही याबाबतची माहितीदेखील या सर्टिफिकेटमध्ये देण्यात आलेली असते. इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तुम्ही जर एखाद्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल, तर त्या प्रकल्पाचा प्लॅन (Infrastructure Plan) तपासणं महत्त्वाचं ठरतं. भविष्यात या ठिकाणी प्रॉपर्टीची किंमत किती वाढू शकते, आजूबाजूला एखादी प्रदूषण वा कचरा पसरवणारी फॅक्टरी तर नाही ना, अशा गोष्टी तुम्हाला प्लॅन तपासल्यानंतर लक्षात येतात. यासोबतच या सोसायटीपासून हॉस्पिटल, शाळा-कॉलेज, पेट्रोल पंप अशा गोष्टी किती दूर आहेत हेदेखील तपासणं महत्त्वाचं ठरतं. कमेन्समेंट सर्टिफिकेट जर तुम्ही अशा ठिकाणी फ्लॅट घेताय ज्या इमारतीचं काम अद्याप सुरू आहे, तर कमेन्समेंट सर्टिफिकेट (Commencement Certificate) म्हणजेच कन्स्ट्रक्शन क्लिअरन्स सर्टिफिकेट (Construction clearance Certificate) तपासणं गरजेचं ठरतं. स्थानिक प्रशासनाच्या मंजूरीनंतरच हे बांधकाम सुरू करण्यात आलं आहे, असं या सर्टिफिकेटमुळे स्पष्ट होतं. Health Insurance: 'या' कंपनीकडून आरोग्य विमा खरेदी करु नका, विमा नियामक IRDA चा सावधगिरीचा इशारा इतर महत्त्वाची कागदपत्रं जर तुम्ही आयतं म्हणजे बांधून तयार असलेलं घर, किंवा घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करत असाल तर ती प्रॉपर्टी नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषद अशा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कक्षेत येते की नाही हे तपासणं आवश्यक आहे. तसंच, त्या भागातील प्रशासनाने सर्व प्रकारचं अप्रूव्हल आणि क्लिअरन्स दिले आहेत का, हे तपासणं आवश्यक आहे. यासोबतच, बिल्डरकडे प्रोजेक्टसंबंधी सर्व कागदपत्रं आहेत का हेदेखील तपासणं गरजेचं आहे. यामध्ये टायटल डीड (Title Deed), रिलिज सर्टिफिकेट, प्रॉपर्टी टॅक्स रिसिट, फायर अप्रूवल (Property fire approval) अशा महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होतो. सोबतच जमिनीच्या वापरासाठीचं व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तसंच रेरा सर्टिफिकेट (RERA certificate) देखील तपासणं आवश्यक आहे. अशाप्रकारे प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी वर दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यास, तुम्ही संभाव्य फसवणूक टाळू शकता.
First published:

Tags: Home Loan, Property, Real estate

पुढील बातम्या