मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold-Silver Rate: 6000 रुपयांनी स्वस्त झालं आहे सोनं, वाचा आणखी किती कमी होणार किंमत

Gold-Silver Rate: 6000 रुपयांनी स्वस्त झालं आहे सोनं, वाचा आणखी किती कमी होणार किंमत

डॉलरमध्ये आलेली मजबुती, कोरोना लशीसंदर्भातील सकारात्मक बातमी यामुळे सोन्याचांदीची झळाळी उतरली आहे. Gold ETF मध्ये देखील गुंतवणूकदार विशेष रस दाखवत नाही आहेत. ऑगस्टमध्ये सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत सोन्याचे दर 6000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव Gold-Silver Rate) घसरले आहेत. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याची वायदा किंमत 0.3 टक्क्यांनी कमी होऊन 50,180 रुपये प्रति तोळा झाली आहे. सलग चौथ्या दिवशी या सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीची वायदा किंमत 0.8 टक्केने उतरले आहेत. या घसरणीनंतर भाव 62,043 रुपये प्रति किलो झाले आहेत. आज सोन्याचे भाव जवळपास 450 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी 718 रुपयांनी कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यामध्ये आतापर्यंत साधारण 6000 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण डॉलरने सोन्यावर दबाव वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे कोव्हिड-19 व्हॅक्सिन (COVID-19 Vaccine) लवकरच उपलब्ध होईल अशी आशा निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 0.1 टक्क्याने कमी होऊन  1,869.86 डॉलर प्रति औंस झाले आहेत. याठिकाणी चांदीचे भाव 0.3 टक्क्याने कमी होऊन 24.24 डॉलर प्रति औंस झाले आहेत. (हे वाचा-LVB च्या ग्राहकांना दिलासा! ठेवीदारांची परतफेड करण्याइतकी रक्कम बँकेकडे उपलब्ध) विश्लेषकांच्या मते सोन्याचे भाव 1,850 डॉलर प्रति औंसवर पोहोचून देखील ते  1,900 डॉलरच्या स्तरापर्यंत नाही पोहोचले आहेत. अनेक कारणांमुळे सोन्याचे दर याच रेंजमध्ये आहेत. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे. (हे वाचा-PLI Scheme: मार्चपर्यंत 50 हजार लोकांना मिळू शकते नोकरी! वाचा काय आहे योजना) डॉलर इंडेक्समध्ये 0.16 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इतर चलन असणाऱ्यांसाठी सोने महागले आहे. दुसरीकडे Pfizer ने बुधवारी अशी माहिती दिली आहे की, त्यांचे व्हॅक्सिन 95 टक्के प्रभावी आहे आणि या लशीने अमेरिका फूड अँड ड्रग अॅ​मिनिस्ट्रेशन (USFDA) द्वारे आपातकालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या सुरक्षा मानकांची पूर्तता केली आहे. Pfizer आता येणाऱ्या काही दिवसात अमेरिका आणि युरोपियन नियामकांकडून मान्यता मिळवेल. ETF मध्ये गुंतवणूकदारांचा कमी रस गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (Gold ETF) गुंतवणूकदारांनीही कमी रस दाखवला आहे. बुधवारी एसपीडीआर गोल्ड ट्रस्टची होल्डिंग 0.60 टक्क्यांनी घसरून 1,219 टन झाली. हे जगातील सर्वात मोठे गोल्ड ईटीएफ आहे. 50 हजारांपेक्षा कमी होणार सोनं तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव 50,000 रुपये प्रति तोळाहूनही खाली येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या  49,550 ची सपोर्ट लेव्हल पाहायला मिळू शकते. चांदीचे दर 62,000 रुपये प्रति किलो पेक्षा कमी होऊ शकतात.
First published:

Tags: Gold, Gold and silver prices today

पुढील बातम्या