नोकरी देणाऱ्या खोट्या एजंटपासून सावधान, अगोदर तपासून पाहा 'ही' कागदपत्र

नोकरी देणाऱ्या खोट्या एजंटपासून सावधान, अगोदर तपासून पाहा 'ही' कागदपत्र

कतारची राजधानी दोहा इथल्या भारतीय दूतावासानं खोट्या एजंटपासून सावध केलंय.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : तुम्हाला कतारमध्ये नोकरी करायचीय? कतारची राजधानी दोहा इथल्या भारतीय दूतावासानं मात्र खोट्या एजंटपासून सावध केलंय. इथे नोकरी शोधणाऱ्यांनी एजंटचा प्रामाणिकपणा तपासून पाहावा आणि आयडी प्रूफ मागावं.

दूतावासानं केलं सावध

दोहा इथल्या दूतावासानं सांगितलंय की भारतीयांनी कतारमध्ये बिझनेस आणि व्हिजिट विसावर नोकरी देण्याबद्दल सांगतायत अशा एजंटांवर विश्वास ठेवू नका.

फ्राॅडपासून असं राहा सावध

दूतावासानं सल्ला दिलाय की नोकरीची आॅफर देणाऱ्याचा प्रामाणिकपणा तपासून पाहा. त्या एजंटकडे आयडी प्रूफ मागा. तो कतार आयडी असतो. भारतीयांची फसवणूक झालीच तर दूतावास त्यांना मदत करतं.

इथेही तपासून पाहा

दूतावासानं सांगितलंय की, भारतीय कर्मचाऱ्यानं कुठल्याही परदेशी कंपनीची नोकरी स्वीकारण्याआधी ई मायग्रेट पोर्टल किंवा पीओई आॅफिसमध्ये पडताळणी करा. दूतावास कार्यालयात ईमेल करून खरी माहिती घ्या.

कतारमध्ये भारतीय नागरिकांची संख्या भरपूर आहे. ती आहे 6 लाख, 91 हजार. त्यात इंजिनियरिंग, शिक्षण, अर्थव्यवस्था, बँक, बिझनेस, मीडिया आणि कष्टकरी लोकांची संख्या जास्त आहे.

...आणि त्याने स्वत:ला झोकून दिले, आत्महत्येचा LIVE VIDEO

First published: April 30, 2019, 7:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading