• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • अलर्ट! कोणत्याही लिंकवर क्लिक करताना विचार करा, होऊ शकते मोठी फसवणूक

अलर्ट! कोणत्याही लिंकवर क्लिक करताना विचार करा, होऊ शकते मोठी फसवणूक

इन्कम टॅक्स विभागानं दिला पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा.

 • Share this:
  मुंबई, 24 जानेवारी: इंटरनेटचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता इन्कम टॅक्स विभागानंही पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे. तुम्हाला आलेला मेसेज, इमेल किंवा लिंक यावर विचारपूर्वक क्लिक करा. अन्यथा तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. असा सावधानतेचा इशाराच ग्राहकांना देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या नावे खोटे ई-मेल, SMS, किंवा वेबसाईटच्या लिंक ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्या जात आहेत. त्यापासून सावध राहण्यासाठी विभागानं हा इशारा दिला आहे. अशा पद्धतीचे प्रकार या आधीही घडले आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दिलेल्या मुदतीवेळी अनेक खोटे मेसेज आणि लिंक वेगानं वायरल होत होत्या. या SMS द्वारे ग्राहकांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्यानं ग्राहकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नोटीस पाठवण्याच्या बहाण्यानं तुम्हाला SMS, E MAIL किंवा वेबसाईटला भेट देण्यास सांगितलं जाऊ शकतं. तुम्ही त्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमची माहिती देण्यासाठी विचारण्यात येईल. तुमची कोणतीही माहिती त्यांना तुमच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी असते. त्यामुळे अशावेळी सावधानता बाळगणं हिताचं ठरेल. किंवा तुम्हाला खोटी लिंक असलेला मेसेज आला आणि त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही अडचणीत याल. कारण लिंक उघडली की तुमच्याकडे युजरनेम, पासवर्ड आणि कार्डाची माहिती मागितली जाईल. ती तुम्ही दिलीत तर मात्र मोठं नुकसान होऊ शकतं. हेही वाचा-तुम्ही नोकरी करता की बिझनेस? इनकम टॅक्स वाचवण्यासाठी करा या 7 गोष्टी इन्कम टॅक्स विभागानं जारी केले ई-मेल @incometax.gov.in @incometaxindiaefiling.gov.in,@tdscpc.gov.in, @cpc.gov.in, @nsdl.co.in, @utiitsl.com, @insight.gov.in SMS सोर्स कोड- ITDEPT, ITDEFL, TDSCPC, ITDCPC, CMCPCI, INSIGT, SBICMP, NSDLTN, NSDLDP, UTIPAN इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइट http://www.incometaxindia.gov.in http://www.incometaxindiaefiling.gov.in http://www.tdscpc.gov.in http://www.insight.gov.in http://www.nsdl.gov.in http://www.utiistl.com खोटे मेसेज किंवा मेल आल्यास काय कराल? करदात्यांना खोटा SMS किंवा ई मेल आला तर त्यांना इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर भेट देऊन तिथे तक्रार पर्याय निवडा http://www.webmanager@incometax.gov.in किंवा http://www.incident@cert-in.org.in या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता. हेही वाचा-म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं होणार फायदेशीर, बजेटमध्ये या करात होणार बदल?
  Published by:Akshay Shitole
  First published: