मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमची एक छोटीशी चूक पडेल महागात; पालकांना येईल INCOME TAX ची नोटीस

तुमची एक छोटीशी चूक पडेल महागात; पालकांना येईल INCOME TAX ची नोटीस

ITR Filing करताना काळजीपूर्वक करा नाहीतर तुमच्या पालकांना त्याचा फटका बसेल.

ITR Filing करताना काळजीपूर्वक करा नाहीतर तुमच्या पालकांना त्याचा फटका बसेल.

ITR Filing करताना काळजीपूर्वक करा नाहीतर तुमच्या पालकांना त्याचा फटका बसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 30 नोव्हेंबर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आयटी रिटर्न (ITR Filing) भरण्याची तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आयकर विवरणपत्र भरण्याची तुमच्याकडे आणखी संधी आहे. मात्र आयकर रिटर्न भरताना छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. तुमच्या चुकीमुळे तुमच्या पालकांना आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो. यामुळे तुमच्या पालकांचा आयकर रिटर्न भरताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

आयकर कायद्याच्या कलम 10 (13 A)  अंतर्गत काही मर्यादांनुसार एचआरएवर आयकर  सूट मिळू शकते. एचआरएअंतर्गत मिळालेल्या रकमेवर कर सूट ज्या व्यक्तीच्या पगारामध्ये घरभाडे भत्ता असेल आणि तो भाड्याच्या घरात राहत असेल त्यालाच घेता येणार आहे. प्रत्येक वर्षी कंपनीने ठरवलेल्या तारखेच्या आत व्यक्तीला भाड्याच्या रकमेच्या पावत्या जमा कराव्या लागतात. परंतु जर तुम्ही भाड्याच्या पावत्या जमा केल्या नसतील तर आयकर भारण्यावेळी टॅक्स लाएबलिटी कमी करू शकता. कोणताही नोकरदार व्यक्ती हाऊस रेंट अलाउन्सच्या माध्यमातून आयकरामध्ये सूट मिळवू शकतो.

हे वाचा - घरबसल्या पैसे कमवण्याची नवी संधी; swiggy सोबत करता येणार हा व्यवसाय

टॅक्समधून सूट मिळण्यासाठी नोकरी करणारी व्यक्ती आपल्या आईवडिलांच्या घरात राहून देखील पावत्या लावून एचआरएमध्ये आयकरात सूट मिळवू शकते. आयकर विभागाच्या कायद्यांतर्गत आई वडिलांच्या घरी राहत असलेला व्यक्ती एचआरएमध्ये आयकरात सूट मिळवू शकते. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आई वडिलांना ही कामे त्यांच्या आयकरामध्ये दाखवावी लागणार आहेत. जर त्यांनी तुमच्याकडून भाड्यापोटी मिळालेली रक्कम आयकरात दाखवली नाही तर त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही नोकरी करत नसाल तर तुम्ही एचआरएच्या माध्यमातून आयकरात सूट मिळण्यासाठी दावा करू शकत नाही.

हे वाचा - Amazon-Flipkart, बँकांविरोधात CAIT चे थोपटले दंड; अर्थमंत्र्यांकडे केली तक्रार

आयटीआर प्रक्रियेद्वारे टॅक्स लाएबिलिटी कमी केल्यानंतर आणि आयटीआर प्रोसेसिंग केल्यानंतर कर परतावा मिळण्यास सुमारे एक महिना लागतो. सामान्यत: आयटीआर प्रक्रिया बेंगळुरूच्या सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरमधून पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिने लागतात. आयकर विभागाने पाठवलेल्या ई-मेलमध्ये करदात्यांकडून त्यांच्या थकबाकी, त्यांच्या बँक खात्यात काही फरक आणि परतावा याबद्दल माहिती विचारली जाते. जर तुम्ही योग्य माहिती वेळेत दिली नाही तर तुमचा आयकर रिटर्न अडकू शकतो.

First published:

Tags: Income tax, Money