Home /News /money /

ATM मधून पैसे काढताना सावध राहा; अन्यथा फ्रॉडची शक्यता; या गोष्टींकडे लक्ष द्या

ATM मधून पैसे काढताना सावध राहा; अन्यथा फ्रॉडची शक्यता; या गोष्टींकडे लक्ष द्या

ऑनलाईन पेमेंट सुविधांसह बँकिंग फ्रॉडच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्याशिवाय एटीएम ट्रान्झेक्शन फ्रॉडचीही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावध राहा, कारण एटीएममधून पैसे काढताना एखाद्या चुकीमुळे तुमचं अकाउंटही खाली होण्याचा धोका आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : कोरोना काळात डिजिटल बँकिकमध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्या प्रमाणात डिजिटल बँकिंग वाढतंय, त्याच वेगात ऑनलाईन पेमेंट सुविधांसह बँकिंग फ्रॉडचं प्रमाणही वाढतं आहे. त्याशिवाय एटीएम ट्रान्झेक्शन फ्रॉडचीही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना सावध राहा, कारण एटीएममधून पैसे काढताना एखाद्या चुकीमुळे, तुमचं अकाउंटही खाली होण्याचा धोका आहे. बँकांकडूनही वेळोवेळी एटीएम फ्रॉडबाबत अलर्ट केलं जातं. ATM फ्रॉडपासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करा - - नेहमी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनचा वापर करा. कमी रहदारी, सूमसाम भागातील एटीएम मशीनमध्ये फ्रॉडची अधिक प्रकरणं पाहायला मिळाली आहेत. - एटीएममध्ये जाताना आजू-बाजूला लक्ष ठेवा. कोणी तुमच्यावर नजर ठेऊन नाही ना हे पाहा. - तुमची ट्रान्झेक्शन झाल्यानंतरची रिसीट कुठेही फेकू नका. त्यातील माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. रिसीट नको असल्यास ती त्वरित फाडून टाका. - ट्रान्झेक्शन झाल्यानंतर कॅन्सल बटण न विसरता दाबा. (वाचा - RBI ची घोषणा; दोन दिवसांत बदलणार बँकेसंबंधी हा महत्त्वाचा नियम) - नेहमी अशाच एटीएमचा वापर करा, जिथे सीसीटीव्ही कॅमेरा आणि गार्ड असेल. - कोणत्याही अनोखळी व्यक्तीची ATM मधून पैसे काढताना मदत घेऊ नका. - ATM मधून बाहेर पडताना कॅश चेक करुन घ्या. सार्वजनिक ठिकाणी पैसे मोजू नका. - सध्या फ्रॉड करणारे एका डिजिटल डिव्हाईसचा वापर करतात. त्याला स्किमर्स डिव्हाईस (skimmers) असं म्हणतात. - एटीएम पिन टाकण्यासाठी कीपॅड आणि कार्ड स्लॉट एकदा चेक करा. कधी-कधी फ्रॉडसाठी लावलेलं मशीन पैसे रोखतं. असं झाल्यास, बँकेत फोन करा. (वाचा - सोने दरात 8000 तर, चांदीत 19000 हून अधिक घसरण; येत्या काळात काय असतील भाव?) - त्याशिवाय, खात्यातून पैसे कट झाले, परंतु एटीएममध्ये आले नसल्यास, बँकेत त्वरित चौकशी करा. - तुमच्या एटीएम कार्डचा पिन कोणासोबतही शेअर करू नका. - कोणतीही बँक तुमचा पिन किंवा पासवर्ड मागत नाही. त्यामुळे एटीएम पिन कोणी फोनद्वारे मागितल्यास तो कॉल फ्रॉड असू शकतो. (वाचा - अलर्ट! आधारसंबंधी 'हे' काम कोणी पैसे घेऊन करत असेल, तर अशी करा तक्रार) पर्सनल डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका - देशभरात पसरलेल्या कोरोना संकटात सध्या ऑनलाईन फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे तुमचं कार्ड, पर्सनल डिटेल्स आणि बँकिंग डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका. त्याशिवाय ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा नुकसान करू शकतो.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: ATM

    पुढील बातम्या