उद्यापासून बदलणार बँकांचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

उद्यापासून बदलणार बँकांचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम

1 नोव्हेंबरपासून म्हणजे उद्यापासून बँकांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदर यात बदल झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : 1 नोव्हेंबरपासून म्हणजे उद्यापासून बँकांचे नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदर यात बदल झाले आहेत. या नियमांमुळे तुमच्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. एकीकडे SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया डिपॉझिटवरच्या व्याजदरात बदल करणार आहे. त्याचवेळी काही राज्यांमध्ये सरकारी बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ बदलणार आहे.

हे आहेत बदल

1. तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचा व्याजदर बदलणार आहे. बँकेच्या 42 कोटी ग्राहकांवर याचा परिणाम होईल. एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटचा व्याजदर आता 3.25 टक्के करण्यात आलाय.

2. महाराष्ट्रातल्या बँकांचं नवं वेळापत्रक ठरवण्यात आलं आहे. आता सगळ्या बँका एकाच वेळी सुरू होतील आणि एकाच वेळी बंद होतील. बँकांच्या कामाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 करण्यात आली आहे. याआधी बँकांचं कामकाज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी होती. पण पैशांचे व्यवहार मात्र दुपारी 3 पर्यंत चालायचे.

(हेही वाचा : मोदी सरकार घेऊ शकतं नोटबंदीसारखा मोठा निर्णय, नवे नियम होणार लागू)

3. SBI बँकेच्या कर्जाचा व्याजदर 8.05 टक्के करण्यात आला आहे. हे नवे दर 10 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर SBI ने व्याजदरात कपात केली आहे.

===========================================================================================

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

First published: October 31, 2019, 3:21 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading