Home /News /money /

Bank Holidays: 13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद; उद्याच उरकून घ्या बँकेतील महत्त्वाची कामं

Bank Holidays: 13 एप्रिलपासून सलग 4 दिवस बँका बंद; उद्याच उरकून घ्या बँकेतील महत्त्वाची कामं

Bank Holidays: येत्या 13 एप्रिलपासून देशात सलग 4 दिवस बँका बंद (Banks closed for 4 consecutive days from April 13) राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही महत्त्वाची कामं प्रलंबित असतील, तर ती सर्व कामे उद्याच पूर्ण करावी लागतील. जाणून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी...

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 11 एप्रिल: येत्या 13 एप्रिलपासून देशात सलग 4 दिवस बँका बंद (Banks will remain closed for 4 consecutive days from April 13) राहणार आहेत. त्यामुळे जर बँकेत काही महत्त्वाची कामं प्रलंबित असतील, तर उद्या म्हणजेच सोमवारी (12 एप्रिल) पूर्ण करून घ्या. कारण उद्या कामं पूर्ण नाही केली तर तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल. खरंतर एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. तर या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकाच्या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकेतील सर्व काम व्यवस्थापित करणं आवश्यक आहे. खाली दिलेल्या यादीत जाणून घ्या एप्रिलमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत. सर्व राज्यांत एकसमान नियम नाहीत सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकेच्या सुट्ट्यांची यादी - 13 एप्रिल - मंगळवार - उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव - 14 एप्रिल - बुधवार - डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू - 15 एप्रिल - गुरुवार - हिमाचल दिन, विशु, बंगाली नवीन वर्ष, सरहुल - 16 एप्रिल - शुक्रवार - बोहाग बिहू - 18 एप्रिल - रविवार - 21 एप्रिल - बुधवार - राम नवमी, गारिया पूजा - 24 एप्रिल - चौथा शनिवार - 25 एप्रिल - रविवार - महावीर जयंती हे ही वाचा- कंगाल झाला 1.5 लाख कोटी रु. नेटवर्थ असणारा करोडपती, शेअर बाजारात ही चूक भोवली सणांमुळे बँका राहणार बंद तेलुगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव आणि उगाडी या सणानिमित्त 13 एप्रिल रोजी बँकेला सुट्टी असेल. तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त बँका बंद असतील. त्यानंतर 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सरहुल निमित्त काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. यानंतर 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंतीची सुट्टी असेल. तसेच 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्यानं त्या दिवशीही सुट्टी असणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bank holidays

    पुढील बातम्या