बँकांनी बदलली कर्ज देण्याची पद्धत, आता पगार नाही तर हा स्कोअर पाहून देणार कर्ज

तुम्ही जर घरासाठी कर्ज घेणार असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. काही सरकारी बँकांनी कर्ज देण्याच्या पद्धतीत बदल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 05:20 PM IST

बँकांनी बदलली कर्ज देण्याची पद्धत, आता पगार नाही तर हा स्कोअर पाहून देणार कर्ज

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : तुम्ही जर घरासाठी कर्ज घेणार असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. काही सरकारी बँकांनी कर्ज देण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यासाठी तुमच्या पगाराच्या ऐवजी तुमचा क्रेडिट स्कोअर पाहिला जाईल. क्रेडिट स्कोअरमध्ये तुम्ही आतापर्यंत किती कर्ज घेतलं, ते कसं फेडलं, तुमच्या नावावर आणखी किती कर्ज आहेत हे पाहिलं जातं. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला मिळणाऱ्या गृहकर्जावर जास्त व्याजदर आकारला जाईल.बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक या 3 सरकारी बँकांनी क्रेडिट स्कोअरच्या आधारे कर्ज द्यायला सुरुवात केली आहे.

1 टक्का कमी व्याज

बँक ऑफ बडोदा कर्ज देण्याबदद्ल या स्कोअरची मदत घेणार आहे. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 900 मध्ये 760 किंवा अधिक असेल तर त्याला 8.1 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर त्याला 1 टक्का कमी दराने कर्ज मिळेल.

क्रेडिट स्कोअर म्हणजे काय ?

क्रेडिट स्कोअरला सिव्हिल स्कोअर असंही म्हटलं जातं. याआधी केलेले व्यवहार आणि कर्जाची परतफेड या माहितीवर हा स्कोअर ठरवला जातो.  याची रेंज 300 ते 900 पर्यंत असते. एखाद्या ग्राहकाला कर्ज देताना हा क्रेडिट स्कोअर तपासला जातो.

Loading...

(हेही वाचा : PMC बँक घोटाळा:दुसऱ्या लग्नासाठी जॉय थॉमस झाला जुनैद खान, बायकोला दिले 9 फ्लॅट्स)_

====================================================================================

VIDEO : तुम्ही कितीही केले हातवारे, आठवलेंची शरद पवारांवर कविता, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 05:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...