SBI ची नवी योजना, तुमचं घरच देईल तुम्हाला 'असं' पेन्शन

SBI ची नवी योजना, तुमचं घरच देईल तुम्हाला 'असं' पेन्शन

SBI, Pension - तुमची नोकरी तुम्हाला पेन्शन देत नसेल तर मग ही योजना फायदेशीर आहे

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : घर खरेदी करण्यासाठी लोकांची आयुष्यभराची पुंजी खर्च होते. त्यामुळे निवृत्तीनंतर हातात फारसे पैसे उरत नाहीत. विशेष करून खासगी नोकरी करणाऱ्यांना या समस्येला तोंड द्यावं लागतं. म्हणूनच SBI एक प्लॅन घेऊन आलीय. त्यात निवृत्तीनंतर तुमचं घरच तुम्हाला पेन्शन देईल. SBI ही योजना घेऊन आलीय.

निवृत्तीनंतर तुमचं घर तुम्हाला पेन्शन म्हणून दर महिन्याला ठराविक रक्कम देऊ शकेल. SBI नं रिव्हर्स मोर्गेज स्किम आणलीय. त्याबद्दल जाणून घेऊ.

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

काय आहे रिव्हर्स मोर्गेज स्किम ? - या योजनेमुळे 60 वर्षांच्या वरील व्यक्तीला नियमित पेन्शन मिळेल. यासाठी तुमचं स्वत:चं घर हवं. हे घर बँक स्वत:कडे गहाण ठेवतं आणि ठरलेली रक्कम दर महिन्याला देते.

या योजनेत बँकेकडून मिळणारे पैसे परत करावे लागत नाहीत. व्यक्तीच्या मृत्यूनंतर घर बँकेच्या ताब्यात जातं. कुटुंबातल्या लोकांना ते घर हवं असेल तर बँकेकडून ते विकत घेता येतं. घराच्या किमचीवर पेन्शन दिलं जातं.

SBI नंतर आता 'या' 3 बँकांनी कमी केले व्याज दर, 'इतका' द्यावा लागेल EMI

कोण घेऊ शकतो फायदा? - 60 वर्षांच्या पुढचे कुणीही भारतीय ही योजना स्वीकारू शकतात. पती-पत्नी मिळून हे करू शकतात. पत्नीचं वय 58 हवं. बँक 10 ते 15 वर्षांसाठी निवृत्ती वेतन देतं. SBI या योजनेअंतर्गत 3 लाख रुपये ते 1 कोटीपर्यंत कर्ज देतात. महिलांना 11 टक्के व्याज दरावर कर्ज मिळतं. तर SBI पेन्शनर्सना वर्षाला 10 टक्के व्याजदरावर कर्ज देतात.

घर खरेदी करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, बिल्डर नाही फसवू शकणार

कोणाला आहे फायदेशीर ? - स्वत:चं घर आहे पण मिळकत नाही अशांना निवृत्तीनंतर हे फायदेशीर आहे.

भारतात फक्त 7 टक्के तरुणांना फायदा - भारतात फक्त 7 टक्के तरुणांना पेन्शन मिळू शकेल. 93 टक्के तरुणांकडे पेन्शनचा पर्याय नाही. त्यामुळे रिव्हर्स मोर्गेज स्किम हा चांगला पर्याय आहे.

VIDEO : चंद्रकांत पाटील म्हणाले, 'त्या' कामाचं तरी महाजनांचं कौतुक करावं!

Published by: Sonali Deshpande
First published: August 9, 2019, 6:52 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading