बँकेचे 8 नियम आजपासून बदलले, आर्थिक नुकसान टाळाण्यासाठी महत्त्वाचे

बँकेचे 8 नियम आजपासून बदलले, आर्थिक नुकसान टाळाण्यासाठी महत्त्वाचे

नवं वर्ष नवे नियम, बँकेपासून आर्थिक व्यवहारापर्यंत बदलणार 'या' 8 गोष्टी जाणून घ्या सविस्तर

  • Share this:

मुंबई, 01 डिसेंबर: नव्या वर्षात आर्थिक व्यवहार करताना काही नियम बदलणार आहेत. त्यासोबतच बँकेचेही काही नियम बदलल्यानं त्याचा परिणाम थेट आपल्यावर होणार आहे. या नव्या वर्षात नेमक्या कोणत्या बदललेल्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे जाणू घ्या सविस्तर.

1. सेबीने गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललं आहे. गुंतवणूकदारांना कोणताही सल्ला द्यायचा असेल तर त्याआधी त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित त्यांचं रिस्क प्रोफायलिंग करावं आणि क्लायंटची मंजुरी घ्यावी असं सेबीने म्हटलं आहे. याबद्दल सेबीने एक परिपत्रक जारी केलं आहे. हे 1 जानेवारी 2020 पासून लागू केलं जाईल.काही गुंतवणूक सल्लागार त्यांनी दिलेल्या गुंतवणूक सल्ल्यासाठी बँकेच्या कॅश डिपॉझिटच्या माध्यमातून फी घेतात किंवा पेमेंट गेटवे च्या माध्यमातून फी वसूल करतात. त्यामुळे क्लायंटकडून घेतलेल्या फी योग्य पद्धतीने ऑडिट होत नाही.

2. नव्या वर्षात भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. SBI घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त दरात होमलोन देणार आहे. या बँकेचं होमलोन 31 डिसेंबर 2019 पर्यंत घेतंल तर 1 जानेवारी 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावं लागेल. SBI ने ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

3. नव्या वर्षात अर्थमंत्र्यांनी बँकेच्या ग्राहकांना एक विशेष भेट दिली आहे. 2020 - 21 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. मर्चंट डिस्काउंट रेट (MDR)फीजचा खर्च सरकार करणार आहे. 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना रुपे डेबिट कार्ड आणि UPI QR च्या माध्यमातून(Digital Payment) ची सुविधा दिली जाईल. यासाठी कंपन्या एमडीआर फी घेणार नाहीत.

4. SBI बँकेनं ATMबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण बदललेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कायम ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरवण्यावर भर देत असते. एटीएमद्वारे होणारे घोटाळे आणि ग्राहकांचे चोरीला परस्पर चोरीला जाणारे पैसे अशा फ्रॉडपासून ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी हे नियम बदलण्यात आले आहेत. स्टेट बँकेनं नेमकं काय नवा नियम आणला आहे जाणून घ्या.

हेही वाचा-रोज 50 रुपये वाचवून मिळवा 10 लाख रुपये, यासाठी आहे हा सोपा उपाय

5. नवं वर्ष नोकऱ्यांच्या क्षेत्रात मोठे बदल घेऊन येऊ शकतं.2020 या वर्षात कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे याबद्दल काही अंदाज वर्तवण्यात आलेत. याच दरम्यान बिझनेसमधल्या अनिश्चततेमुळे बाकीच्या क्षेत्रात नोकरभरती कमी करण्यात आली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार पुढच्या वर्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 60 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध असतील. यामध्ये डेटा अॅनॅलिटिक्स, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, डेटा सायन्स, ML, NLP, डेटा व्हिज्युअलायझेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, AI आणि ब्लॉकचेन यासारख्या नोकऱ्यांचा समावेश असेल.

6. ई कॉमर्स कंपन्यांच्या मनमानीपासून तुमचा बचाव करायचा असेल तर हे नियम महत्त्वाचे आहेत. हे नियम 31 मार्चच्या आधी लागू करण्यात येणार आहेत. या नियमांनुसार ई कॉमर्स कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे भाव मनमानीपणे लावू शकणार नाहीत. पंतप्रधान गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.ऑनलाइन शॉपिंगच्या नियमांबद्दल 2 डिसेंबरपर्यंत सूचना मागवून घेण्यात आल्या होत्या. हे नियम ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत लागू करण्यात येतील. यामुळे नकली उत्पादनांच्या विक्रीला आळा बसेल आणि त्यासाठी कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल. रिफंडची प्रक्रिया सुधारण्यात येईल आणि 24 तासांत रिफंड मिळेल. यामुळे कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीही देऊ शकणार नाही. त्याचबरोबर या कंपन्यांना भारतात नोंदणी करणं महत्त्वाचं होणार आहे.

7. आजापासून एनइएफटी करण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. एनइएफटीची सुविधा विनाशुल्क 24 तास ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मात्र ओटीपी आजपासून बंधनकारक असणार आहे.

8. आजपासून फक्त चिपवाले कार्ड बँकेत चालणार आहेत. विनाचिप कार्ड असतील असे एटीएम आजपासून बंद करण्यात आले आहेत. यासोबतच Senior Citizen Saving Scheme मध्ये बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा-ATM मधून पैसे काढताना आजपासूनचा नवा नियम माहिती आहे का? पाह SBI ने काय सांगितलं

First published: January 1, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading