Home /News /money /

खिशात डेबिट-क्रेडिट कार्ड नसेल तरीही करता येईल पेमेंट, ही बँक देतेय खास सुविधा

खिशात डेबिट-क्रेडिट कार्ड नसेल तरीही करता येईल पेमेंट, ही बँक देतेय खास सुविधा

IDFC First Bank लवकरच आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा लाँच करणार आहे. यामध्ये तुम्ही डेबिट आणि क्रेडिट नसताना देखील पेमेंट करू शकणार आहात.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : फेस्टीव्ह सीझन सुरू होण्यापूर्वीच बँकानी त्यांच्या ग्राहकांना विविध ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान काही बँका ग्राहकांच्या सोयीसाठी काही सुविधा देखील पुरवत आहेत. इंटरनेट बँकिंगबरोबरच विविध प्रकारच्या ऑनलाइन सुविधा बँका आपल्या ग्राहकांना पुरवत असतात. आता IDFC First Bank लवकरच आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा लाँच करणार आहे. यामध्ये तुम्ही डेबिट आणि क्रेडिट नसताना देखील पेमेंट करू शकणार आहात. 'सेफपे' असे या नवीन सुविधेचं नाव आहे. त्यामुळं तुम्हाला एटीएममध्ये देखील जाण्याची गरज भासणार नाही. पॉईंट ऑफ सेल (PoS) टर्मिनलवर म्हणजे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंट स्वीकारणारं मशीन असणाऱ्या कोणत्याही अधिकृत ठिकाणी  नीयर फील्ड कम्युनिकेशन (NFC) या सुविधेमार्फत तुम्ही पेमेंट करू शकणार आहात. मोबाइल अ‍ॅपमध्ये असणार NFC सुविधा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सगळ्या फोनमध्ये NFC सेवा उपलब्ध नसते त्यामुळे ग्राहके पेमेंट करू शकत नाहीत. याचीच दखल घेऊन बँकेने त्यांच्या अ‍ॅपमध्येच NFC सेवा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून तुमच्या अ‍ॅपमधील डिजिटल डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर करून तुम्हाला व्यवहार करता येतील. त्यासाठी प्रत्यक्ष डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जवळ नसेल तरीही चालू शकेल.  तुम्ही यामार्फत एकावेळी कार्ड न वापरता NFC ने  2000 रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता. मात्र दिवसभरात तुम्ही 20 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहात. (हे वाचा-दोन महिन्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर,वाचा आज काय होणार बदल) या सेफपे सुविधेची चाचणी झाली असून लवकरच ग्राहकांसाठी ही सुविधा खुली केली जाणार आहे. बँकेच्या बचत खातेधारकांना ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नवीन फीचरविषयी माहिती देताना IDFC First Bank च्या कर्ज विभागाचे अमित कुमार म्हणाले की, ' हल्लीच्या ऑनलाइनच्या जमान्यात अनेक जण ऑनलाइन आणि मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट करत आहेत. कोरोनाच्या या संकटामध्ये यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणण्याच्या विचारात होतो. या सुविधेमुळे ग्राहकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड बाळगण्याची देखील गरज नाही. यात ते गहाळ होण्याची देखील भीती नसल्यानं ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल.' अशा पद्धतीने करा वापर सुरुवातीला तुम्हाला IDFC First Bank च्या अ‍ॅपमध्ये डेबिट कार्ड जोडावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही या सेफपे या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहात. त्यानंतर अ‍ॅपमधील NFC पर्याय सुरू केल्यानंतर तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार आहात. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी पेमेंट करायचे आहे तिथे एनएफसी मान्य पीओएस टर्मिनल समोर अ‍ॅप धरल्यानंतर तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती प्रसारित होऊन 30 सेकंदाच्या आत तुम्ही पेमेंट करू शकणार आहेत. (हे वाचा-बँक खात्यातून चोरी झाल्यानंतर हे काम केल्यास मिळतील तुमचे पैसे,RBIने दिली माहिती) या सुविधेमुळे ग्राहकांची खूप मोठी सोय होणार आहे. NFC  या सुविधेमध्ये तुम्हाला कार्डाचा व्यवहार कारावा लागत नाही त्यामुळे पिन दुसऱ्याला कळेल ही चिंता राहत नाही तसंच तो लक्षात ठेवण्याचेही कष्ट वाचतात. याआधी ही सुविधा असलेला फोन असणे प्रत्येक ग्राहकाला शक्य होत नव्हते त्यामुळे बँकेने ग्राहक हिताचा निर्णय घेत अ‍ॅपमध्येच ही सुविधा उपलब्ध करणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या