खूशखबर! या सरकारी बँकेची ग्राहकांना दिवाळी भेट, गृह-वाहन कर्ज झाले स्वस्त

खूशखबर! या सरकारी बँकेची ग्राहकांना दिवाळी भेट, गृह-वाहन कर्ज झाले स्वस्त

या सरकारी बँकेने आरएलएलआर- रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (Repo Linked Lending Rate -RLLR) वर आधारित व्याजदरांमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर: बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेने आरएलएलआर- रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (Repo Linked Lending Rate -RLLR) वर आधारित व्याजदरांमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. या निर्णयानंतर नवीन व्याजदर 6.90 टक्क्यांवर आले आहेत. या निर्णयानंतर आरएलएलआर आधारित सर्व कर्जांवरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी होईल. अर्थात ग्राहकांना त्याच्या EMI वर 0.15 टक्क्याने दिलासा मिळणार आहे. याशिवाय बँकेने प्रोसेसिंग फी देखील न आकारण्याची घोषणा केली आहे.

7 नोव्हेंबरपासून नवे व्याजदर लागू

बँकेने दिलेल्या माहितीनुसार नवीन व्याजदर 7 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेने गृहकर्ज, वाहन कर्ज, सोन्यावरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि एमएसएमई वरील व्याज इ.मध्ये 0.15 टक्क्यांची कपात केली आहे. बँकेंचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर हेमंत टमटा यांच्या मते सणासुदीच्या काळात बँकेने गृह, वाहन आणि गोल्ड लोनवरील प्रोसेसिंग फी देखील न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

(हे वाचा-कमी जोखीम आणि चांगला रिटर्न देणारी पोस्टाची योजना! जाणून घ्या कसे मिळतील 16 लाख)

महिलांना अतिरिक्त सूट

बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांना अतिरिक्त 0.05 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात (आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स) काम करणाऱ्यांना देखील अतिरिक्त 0.05 टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे.

बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेने देखील घटवले व्याजदर

याआधी बँक ऑफ बडोदाने देखील त्यांच्या ग्राहकांना दिवाळी भेट देत व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील तिसरी मोठी बँक असणाऱ्या BOB ने रेपो रेटवर आधारीत व्याजदर (BRLLR) 6.85 टक्के केले आहेत. हे दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.

(हे वाचा-मोठी बातमी! रेल्वेच्या या सरकारी कंपनीतील भागीदारी विकणार मोदी सरकार)

सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने देखील व्याजदरात कपात केली आहे. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या गृहकर्जासाठी 10 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. बँकेने असी माहिती दिली आहे की महिला कर्जदारांना अशा कर्जासाठी या कपातीनंतरही अतिरिक्त सूट मिळेल. हे नवीन दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 10, 2020, 12:06 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या