SBI Alert : तुमच्या बँक अकाउंटमधून अशी होऊ शकते चोरी!

SBI Alert : तुमच्या बँक अकाउंटमधून अशी होऊ शकते चोरी!

SBI, Fishing Mail - एसबीआयनं ग्राहकांना सावध केलंय. बँक खात्यातल्या पैशाच्या चोरीपासून कसं राहायचं सावध ते पाहा

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट : भारतात लोक कॅशलेस सिस्टिम वापरतायत. शाॅपिंगच्या आधी ATM मधून पैसे काढायचं असो किंवा पेट्रोल पंपावर डेबिट कार्डानं पेमेंट करणं असो. सगळीकडे डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर वाढलाय. पण तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही या कार्डाचा उपयोग योग्य प्रकारे केला नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल. म्हणूनच देशाची मोठी सरकारी बँक SBI नं ग्राहकांना सावध केलंय. इंटरनेटवर चोरी करून लोकांची बँक अकाउंट रिकामी केली जातायत.

बँकेनं आपल्या वेबसाइटला म्हणाले की फिशिंग ही एक इंटरनेट चोरी आहे. याचा उपयोग तुमचं बँक खातं, बँकिंग पासवर्ड, क्रेडिट कार्डाचा नंबर, वैयक्तिक माहिती या गोष्टी चोरल्या जातात. हॅकर तुमच्या खात्यातले पैसे काढू शकतो. यापासून कसं वाचायचं ते पाहा-

'या' नोकरीत मिळणार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार, 'असा' करा अर्ज

असं जातं फसवलं

फिशिंग हल्ला करताना आर्थिक माहिती चोरण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा वापर केला जातो.

इंटरनेट बँकिंग युजरला एक ई मेल येतो.

त्या मेलमध्ये दिलेल्या हायपर लिंकवर क्लिक करायला सांगितलं जातं.

हायपर लिंकवर क्लिक केलं तर नकली वेबसाइट उघडली जाते. ती बँकेच्या खऱ्या वेबसाइटप्रमाणे दिसते.

पोस्ट ऑफिस सुरू करतेय 'ही' नवी सुविधा, घरबसल्या मिळतील फायदे

ईमेलमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे बक्षीस मिळेल नाही तर दंड बसेल, असं सांगितलं जातं.

पासवर्ड, बँक खात्याचा नंबर द्यायला सांगितलं जातं.

तुम्ही सर्व माहिती भरून सबमिट केली की मग तुमच्या समोर एरर पेज ओपन होतं. म्हणजे तुम्ही फिशिंग मेलला बळी पडलात, असं समजायचं.

अशी घ्या काळजी

तुमच्या डिव्हाइसमध्ये नियमित अँटिव्हायरस स्कॅन चालू ठेवा. ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये URL टाइप करा. पब्लिक डिव्हाइस, ओपन नेटवर्क आणि फ्री वायफाय वापरू नका. हे वापरलंत तर तुमची खासगी माहिती लीक होण्याची शक्यता आहे.

इंटरनेट बँकिंग पासवर्ड नेहमी बदलत राहा. तुमचं बँक खातं आणि नेट बँकिंग यांची माहिती फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका. नेहमी लाॅग इन डेट आणि वेळ तपासून पहात राहा.

खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

तुम्ही तुमच्या फोनमध्ये बँक खात्याचा नंबर, एटीएम कार्ड, पासवर्ड या माहितीचे फोटो ठेवलेत तर माहिती सहज लीक होऊ शकते.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही फिशिंग ईमेलवर कधी क्लिक करू नका. ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शन करताना नेहमी वन टाइम पासवर्ड ( OTP ) निवडा. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते.

नेट बँकिंगचा पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड ( CCV ) आणि युपीआय पिन कुणाबरोबर शेअर करू नका. तुम्ही पासवर्ड विसरलात, तर स्मार्ट पद्धतीनं तो पुन्हा शोधा किंवा बदला.

बँकेत पैसे ठेवून तुम्ही निवांत राहू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायला हवी.

VIDEO: मैत्रीसमोर पाऊसही फिका, सच्चा दोस्तांनी ठाणे स्टेशनवरच साजरा केला बर्थडे

Published by: Sonali Deshpande
First published: August 3, 2019, 4:32 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading