मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डिजिटल इंडियामध्ये बँकिंग फ्रॉड प्रकरणात वाढ

डिजिटल इंडियामध्ये बँकिंग फ्रॉड प्रकरणात वाढ

SBI Alert! असे कॉल येत असतील तर सावधान

SBI Alert! असे कॉल येत असतील तर सावधान

बँकेला या फ्रॉडवर मात करण्यासाठी इंटेलिजेन्स नेटवर्कसह सहकार्य प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. इंटेलिजेन्स नेटवर्क बँकिंग इकोसिस्टमच्या फसवणूक व्यवस्थापनाची चौकट मजबूत करण्यास सक्षम आहे. याद्वारे ग्राहकांनाही सतर्क केलं जाऊ शकतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे (Digital Transaction) बँक अकाउंटमध्ये (Bank Account) फसवणूकीचे (Fraud) प्रकार वाढले आहेत. ऑगस्टमध्ये 160 कोटी लोकांनी पैशांच्या व्यवहारांसाठी यूपीआय प्लॅटफॉर्मचा (UPI Platform) वापर केला. पण या वाढत्या ऑनलाईन व्यवहारादरम्यान, झालेल्या फ्रॉड-फसवणूकीच्या प्रकारांनी बँकिंग सेक्टरमध्ये मोठी खळबळ आहे. वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे, फसवणूकीकडे लक्ष ठेवण्यासाठी बँकेच्या सिस्टमलाही सतत अपग्रेड करण्याची गरज आहे. इंटेलिजेन्स नेटवर्क - बँकेला या फ्रॉडवर मात करण्यासाठी इंटेलिजेन्स नेटवर्कसह सहकार्य प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. इंटेलिजेन्स नेटवर्क बँकिंग इकोसिस्टमच्या फसवणूक व्यवस्थापनाची चौकट मजबूत करण्यास सक्षम आहे. याद्वारे ग्राहकांनाही सतर्क केलं जाऊ शकतं.

(वाचा - PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स)

भारतीय रिजर्व्ह बँकेने फसवणूकी प्रकरणी दोन वर्षांपूर्वी एक नियम लागू केला होता. रिअल टाईम आधारावर डिजिटल पेमेंट फ्रॉडवर नजर ठेवण्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची सेंट्रल पेमेंट फ्रॉड रजिस्ट्रीही आहे. बँकेने फसवणूकीच्या प्रकारांपासून वाचण्यासाठी कंप्लायंट इंफोर्मेशन शेअरिंग सिस्टम वापरावी. यात मेटाडेटा फॉरमॅट, फ्रॉड मॉडेल आणि इतर विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.

(वाचा - नोकरी करण्याआधीच तुमच्या मुलांच्या नावे असेल मोठी रक्कम;जाणून घ्या काय आहे प्लान)

बँकिंग फसवणूकीपासून वाचण्यासाठी प्रिडिक्टिव मशीन लर्निंग मॉडेलची आवश्यकता आहे. यामुळे 24 तास फ्रॉड ओळखण्यास मदत होऊ शकते. डेटा तपासणं, त्याचं विश्लेषण करणं आणि फसवणूकीची गणनाही करता येईल. नेटवर्क इंटेलिजेन्सवर आधारित ही यंत्रणा प्रभावी ठरेल.
First published:

Tags: Reserve bank of india

पुढील बातम्या