SBI ग्राहकांसाठी खूशखबर, 1ऑगस्टपासून बँकेच्या 'या' सेवा होतील मोफत

SBI, Bank, Money - स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी नवी मोफत सेवा सुरू करतेय.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 03:45 PM IST

SBI ग्राहकांसाठी खूशखबर, 1ऑगस्टपासून बँकेच्या 'या' सेवा होतील मोफत

मुंबई, 12 जुलै : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI )आपल्या ग्राहकांसाठी पैशाच्या देवाण-घेवाणीची संबंधित IMPS सेवा 1 ऑगस्टपासून मोफत करण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार SBI नं आता RTGS आणि NEFT चार्जेस काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सामान्यांसाठी मोठी घोषणा केली होती. SBI नं हा निर्णय 1 जुलै 2019 पासून अमलात आणलाय. या निर्णयानंतर इंटरनेट बँकिंग स्वस्त होतेय. आता RBI नं बँकांना हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवायला सांगितलंय. आता SBIमधून RTGS आणि NEFT करणं स्वस्त झालंय.

काय असतं IMPS?

इमिडिएट पेमेंट सर्विसेस म्हणजेच IMPS. याद्वारे तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. अकाउंट होल्डर मोबाइलद्वारे दुसऱ्या व्यक्तीला फंड ट्रान्सफर करू शकतात. ही सुविधा NPCI द्वारे केली जाते.

फ्लिपकार्ड लाँच करतंय क्रेडिट कार्ड, खरेदीवर ग्राहकांना मिळतील 'या' सवलती

असा होतो फायदा

ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. यात रियल टाइम फंड ट्रान्सफर होतो.

तुम्ही मध्यरात्री 3 वाजता फंड ट्रान्सफर केलात, तरी त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो.

'या' तारखेनंतर IT रिटर्न भरला तर 'इतका' पडेल दंड

ही सेवा तुम्ही सुट्टीच्या दिवशीही वापरू शकता. एनईएफटी आणि आरटीजीएस या सेवा ठराविक वेळीच मिळतात. शिवाय सुट्टीच्या दिवशी ट्रान्सफर केलेले पैसे दुसऱ्या दिवशी मिळतात.त्यामुळे IMPS जास्त फायदेशीर आहे.

IMPS द्वारे फंड ट्रान्सफर करायची वेळ

आठवड्यात 24x7. म्हणजे 7 दिवस 24 तास सतत ही सेवा सुरू असते.

यात फंड ट्रान्सफर करायची मर्यादाही आहे.

मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा? निवड समितीवर भडकले गावस्कर

कमीत कमी 1 रुपया

जास्तीत जास्त 2 लाख रुपये.

SBI नं आपल्या ग्राहकांसाठी ही सेवा मोफत देऊन चांगली भेट दिलीय.

'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: SBI
First Published: Jul 12, 2019 02:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close