Home /News /money /

अलर्ट! मार्च महिन्यात सलग 6 दिवस बंद राहणार बँका, आधीच करून घ्या तुमची कामं

अलर्ट! मार्च महिन्यात सलग 6 दिवस बंद राहणार बँका, आधीच करून घ्या तुमची कामं

तुमचं बँकेचं काही महत्त्वाचं काम असेल तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच लवकर करून घ्या. मार्च महिन्यात बँकांचा संप आणि सुट्यांमुळे बँकांचं कामकाज बंद राहू शकतं.

    नवी दिल्ली, 24 मार्च : तुमचं बँकेचं काही महत्त्वाचं काम असेल तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच लवकर करून घ्या. मार्च महिन्यात बँकांचा संप आणि सुट्यांमुळे बँकांचं कामकाज बंद राहू शकतं. 10 मार्च ते 15 मार्च या काळात बँका बंद राहण्याची शक्यता आहे. याशिवाय बँक कर्मचारी संघटना 11 मार्चपासून 13 मार्चपर्यंत संपाची घोषणा करू शकतात. 14 मार्चला महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि 15 मार्चला रविवारची सुटी. यामुळे 10 मार्चपासून सलग 6 दिवस बँका बंद राहतील. त्याआधी 8 मार्चला रविवार आहे. यामुळेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात फक्त एक दिवस 9 मार्चला बँका सुरू राहतील. बँक कर्मचाऱ्यांचा संप मीडिया रिपोर्टनुसार, बँक कर्मचारी संघटना 11 ते 13 मार्च काळात संपाची घोषणा करू शकतात. बँक कर्मचारी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी हे दोन दिवस संपावर होते. पण आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात दर 5 वर्षांनी वाढ केली जाते. मागच्या वेळी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 2012 मध्ये वाढ केली होती. त्यामुळे 2017 साली ही वाढ होणं अपेक्षित होतं. ती न झाल्याने कर्मचारी संपावर जाऊ शकतात. याशिवाय आठवड्यातून 2 दिवस सुटी मिळावी, अशीही या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. बेसिक पगाराशिवाय स्पेशल अलाउन्स, फॅमिली पेन्शन अशाही त्यांच्या मागण्या आहेत. (हेही वाचा : हॉट सुपरमॉडेल ते फर्स्ट लेडी! अशी झाली होती मेलेनिया आणि ट्रम्प यांची भेट) 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या काळात बँका बंद 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत सलग 3 दिवस बँका बंद होत्या. 21 फेब्रुवारीच्या शुक्रवारी महाशिवरात्री होती. त्यामुळे बँकांनी सुटी होती. यानंतर 22 फेब्रुवारीला महिन्याचा चौथा शनिवार आणि 23 फेब्रुवारीला रविवारची सुटी होती. =======================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Bank strike, Money

    पुढील बातम्या