दिवाळीच्या आधी आहे बँकांचा संप, पूर्ण करून घ्या राहिलेली कामं

दिवाळीच्या आधी जर तुमचं बँकेचं काम राहिलं असेल तर ही बातमी नक्की वाचा. बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात 22 ऑक्टोबरला बँक कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 03:33 PM IST

दिवाळीच्या आधी आहे बँकांचा संप, पूर्ण करून घ्या राहिलेली कामं

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : दिवाळीच्या आधी जर तुमचं बँकेचं काम राहिलं असेल तर ही बातमी नक्की वाचा. बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात 22 ऑक्टोबरला बँक कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर होऊ शकतो.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने पुकारलेल्या या संपाला भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (एटक)ने ही पाठिंबा दिला आहे. या संपानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहतील.

सरकारने 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण करून 4 बँका बनवण्याचा निर्णय घेतला. बँक कर्मचाऱ्यांचा या निर्णयाला विरोध आहे. 'सरकारला 6 राष्ट्रीय बँका बंद करायच्या आहेत. हा निर्णय दुर्दैवी आणि अनपेक्षित आहे', असं एटक या संघटनेनेही म्हटलं आहे.

(हेही वाचा : तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना?)

बँकांचा हा संप लक्षात घेता दिवाळीच्या आधीच बँकांचं कामकाज पूर्ण करून घेणं आवश्यक आहे.आंध्रा बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँका बंद होणार आहेत. या सगळ्या बँकांची कामगिरी चांगली असून देशाच्या आर्थिक विकासात यांचं योगदान आहे, असं एटकचं म्हणणं आहे.

Loading...

=====================================================================================

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...