RBI लवकरच बदलणार ATM संबंधीचे नियम; ग्राहकांवर होणार हा परिणाम

RBI लवकरच बदलणार ATM संबंधीचे नियम; ग्राहकांवर होणार हा परिणाम

विविध बँकांची ATM कार्ड वापरण्याचे नियम बदलणार आहेत. रिझर्व बँकेने RBI गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : विविध बँकांची ATM कार्ड वापरण्याचे नियम बदलणार आहेत. रिझर्व बँकेने गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केलं. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी  ATM Service Provider नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे.AT

सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात येणार आहेत.

व्यापारी बँका आणि नागरी सहकारी बँकांमध्ये ATM swtich application सेवा पुरवठादाराप्रमाणे बदलतं. त्यासाठीचे नियम नाहीत. ते 31 डिसेंबरला जारी होतील. ते झाल्यानंतर एटीएम वापरण्यासंबंधीचे नियम ग्राहकांसाठीही बदलू शकतात.

दरम्यान 15 डिसेंबरपासून काही बँकांनी एटीएम सेवेसाठी जादा पैसे आकारायचं ठरवलं आहे.  तुमचं जर ICICI बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. 15 डिसेंबरपासून आयसीआयसीआय बँक बचत खात्याच्या काही नियमांमध्ये बदल करणार आहे. तुम्हाला जर हे बदलेले नियम माहीत नसतील तर तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून चार्ज लावण्यात येणार आहे. त्यामुळे बदलेल्या नियमांची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो.

-------------------------

अन्य बातम्या

अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला दणका, RBI ने जाहीर केला GDP

PMC बँक खातेधारकांना ठाकरे सरकारचा दिलासा; मोठ्या निर्णयाची शक्यता

'उन्नाव' पुन्हा पेटलं? बलात्कार प्रकरणातील पीडितेला नराधमांनी जिवंत पेटवले

अम्युझमेंट राइडमधून पडली 5 मुलं, अंगावर काटा आणणारा थरारक VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATMrbi
First Published: Dec 5, 2019 04:22 PM IST

ताज्या बातम्या