Home /News /money /

Bank Privatisation: पहिल्या टप्प्यात 2 सरकारी बँका होणार खाजगी! आज होणार निर्णय, वाचा कोणत्या बँकांचा यादीत समावेश

Bank Privatisation: पहिल्या टप्प्यात 2 सरकारी बँका होणार खाजगी! आज होणार निर्णय, वाचा कोणत्या बँकांचा यादीत समावेश

Bank Privatisation: बुधवारचा दिवस बँकिंग सेक्टरसाठी महत्त्वाचा असणार आहे. बँकांच्या खाजगीकरणासाठी (Bank Privatisation) पहिल्या प्रक्रियेसाठी सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये दोन सार्वजनिक बँकांचं (PSB) खाजगीकरण होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल: आजचा दिवस बँकिंग सेक्टर (Banking Sector) साठी अत्यंत महत्त्वाची दिवस ठरण्याची शक्यता आहे. सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये दोन सार्वजनिक बँकांचं (PSB) खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांच्या मते खाजगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरुप देण्यासाठी आज 14 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि अर्थ मंत्रालयाचे (Finance ministry) आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये खाजगीकरण होणाऱ्या संभाव्य बँकांबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चार ते पाच PSB ची शिफारस नीती आयोगाकडून करण्यात आली आहे आणि या बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल खाजगीकरणाच्या यादीत कोणत्या बँका? बिझनेस स्टँडर्डच्या अहवालाच्या मते, नीती आयोगाने 4-5 बँकांची शिफारस केली आहे.  अशीही माहिती मिळते आहे की, या बैठकीत या दोन बँकांचे नाव निश्चित केले जाईल. खाजगीकरणाच्या यादीमध्ये  बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) , इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक (Central Bank) या बँकांच्या नावाची चर्चा आहे. आतापर्यंत याबाबत कोणताही निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. मात्र मंगळवारी या बँकांच्या शेअरमध्ये देखील उसळी पाहायला मिळते आहे. BSE मधील माहितीनुसार अनेक डील्सअंतर्गत एक लाखापेक्षा अधिक शेअर्सना बदलल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये 15.6 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. (हे वाचा-पंजाब नॅशनल बॅंक महिलांना फ्रीमध्ये देणार ट्रेनिंग, महिन्याला होईल लाखोंची कमाई) यादीत नसतील या बँका नीती आयोगाच्या मते स्टेट बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त ज्या बँकांचे गेल्या काही दिवसांत विलिनीकरण झाले आहे, त्या बँकांचे खाजगीकरण होणार नाही. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. अहवालाच्या आधारे खाजगीकरणाच्या यादीत SBI व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा असणार नाहीत. (हे वाचा-Air India च्या विक्रीच्या हालचालींना वेग; सरकार उपकंपन्याही विकण्याच्या विचारात) अर्थसंकल्पात झाली होती खाजगीकरणाची घोषणा सरकारने अर्थसंकल्पात (Budget 2021) बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. पुढील आर्थिक वर्षात दोन बँकांच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. खासगीकरणाच्या यादीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक या नावांची चर्चा आहे. खाजगीकरणासाठी अद्याप कोणत्याही बँकेला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि एक विमा कंपनीचे खाजगीकरण प्रस्तावित केले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Rbi, Rbi latest news

    पुढील बातम्या