नवी दिल्ली, 20 जून : किरकोळ व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) देण्यात आलेल्या कर्ज वाढी बाबतीत वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. सन 2020-21 मध्ये पुण्याच्या या बँकेनं एमएसएमई कर्जात 35 टक्क्यांची वाढ नोंदवली. बँकेने एमएसएमई क्षेत्रातील युनिटसाठी 2020-21 या आर्थिक वर्षात 23,133 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत.
चेन्नईची इंडियन बँक या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या बँकेने 15.22 टक्के वाढीसह एमएमएमई क्षेत्राला एकूण 70,180 कोटी रुपयांचे कर्ज दिलं. किरकोळ क्षेत्रातील कर्जाच्या बाबतीत बीओएममध्ये सुमारे 25.61 टक्क्यांची वाढ नोंदली गेली, जी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा जास्त आहे. एसबीआयने या विभागात 16.47 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
किरकोळ क्षेत्राला देण्यात आलेल्या एकूण कर्जात एसबीआयने रकमेच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्रपेक्षा 30 पट अधिक कर्ज दिलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या विभागात एकूण 28,651 कोटी रुपये दिले आहेत तर एसबीआयने 8.70 लाख कोटींचे कर्ज दिले आहे. आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षात बँक ऑफ बडोदाने किरकोळ क्षेत्राला दिलेल्या कर्जामध्ये 14.35 टक्के वाढ झाली असून त्यात एकूण 1.20 लाख कोटींचे कर्ज देण्यात आले आहे.
हे वाचा - इंजिनिअरिंग डिप्लोमा केलाय? मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क
2020-21 आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्रचा एकल निव्वळ नफा 42 टक्क्यांनी वाढून 550.25 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 388.58 कोटी रुपये होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank services, Pune