मुंबई : आतापर्यंत महिन्याला 50 रुपये बँकेत गुंतवा अशी स्कीम कुठे ऐकली आहे का? नाही ना बँका तर 1000 रुपयांच्या खाली घेतही नाहीत. पण सर्वसामान्य आणि शेतकरी यांचा विचार करून किंवा कामगार वर्गाचा विचार करून बँक ऑफ महाराष्ट्रने एक उत्तम सुविधा आणली आहे.
या ऑफरचं नाव आहे मिनी RD. यामध्ये महिन्याला तुम्ही 50 रुपये खात्यावर जमा करायचे आहेत. त्यावर तुम्हाला व्याजही मिळेल आणि नंतर ते पैसे तुम्ही तुमच्या खात्यात वळते करू शकता किंवा फिक्स डिपॉझिटला वळते करू शकता.
कसं सुरू करायचं खातं?
तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफ लाईन दोन्ही पद्धतीनं खातं सुरू करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला RD साठी अर्ज करायचा आहे. तिथे सगळी माहिती भरा. त्यानंतर 50 रुपये तुम्हाला किती महिन्यासाठी साठवायचे आहेत ते देखील सिलेक्ट करायचं आहे. 9 महिने, एक वर्ष की दीड वर्ष हे तुम्ही निवडायचं आहे.
त्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला पैसे खात्यात हवेत की फिक्ड डिपॉझिटला वळते करावेत हा पर्याय देखील तुम्ही निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही सगळं वाचून कन्फर्म करा आणि सबमिट करा. तुमचं आरडी खातं सुरू होईल.
#Recurringdeposit allows you to save money bit by bit and earn interest for the outstanding balance. #Mahabank offers Recurring Deposits starting from ₹50 for a bigger and higher returns in the future.
Click to know more: https://t.co/hDlqL8THz4#BankofMaharashtra #investment pic.twitter.com/QP3djfjUKm — Bank of Maharashtra (@mahabank) December 1, 2022
काय आहे वैशिष्ट्यं
महिन्याला फक्त तुम्हाला 50 रुपये साठवायचे आहेत
त्यावर तुम्हाला चांगला व्याजदर मिळेल असं बँकेकडून आश्वासन देण्यात आलं आहे
साधार 6 ते ९ आणि जास्तीत जास्त दीड वर्षांसाठी तुम्हाला हे पासे साठवता येतात
यावर तुम्हाला लोन देखील मिळणार आहे.
तुम्ही दर महिन्याला ठरावीक रक्कम तुमच्या खात्यावर ठेवू शकता. तुम्हाला ऑटो डेबिटचा पर्याय ठेवता येतो.
ऑनलाइन RD काढली असेल तर तुम्ही हे पैसे तुम्हाला हवे तेव्हा मोडू शकता. त्यासाठी ठरावीक रक्कम पेनल्टी म्हणून आकारली जाते. मात्र तुम्ही ही RD मोडू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank Of Maharashtra, Bank services, Money