Home /News /money /

Loan Update : घर किंवा कार खरेदी करायची आहे? 'या' बँकेच्या मान्सून ऑफरचा घ्या फायदा

Loan Update : घर किंवा कार खरेदी करायची आहे? 'या' बँकेच्या मान्सून ऑफरचा घ्या फायदा

Loan Update: आपलं घर असावं तसंच आपल्याकडं कार असावी असं अनेकांना वाटतं. पण एकदम या दोन्ही गोष्टी घेणं शक्य होत नाही. तुम्ही घर किंवा कार घेणार असलात तर आनंदाची बातमी आहे.

    मुंबई, 5 ऑगस्ट : कोव्हिड काळानंतर  आता दैनंदिन जनजीवन सुरळीत होत आहे. उद्योग, शाळा, इतर संस्थेचं कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू झालंय, सामान्य नागरिकांची आर्थिक घडीही आता बसत आहे. त्यामुळे घरखरेदी किंवा कारखरेदीकडे नागरिकांचा ओढा पुन्हा सुरू झाला आहे. आपलं घर असावं तसंच आपल्याकडं कार असावी असं अनेकांना वाटतं. पण एकदम  या दोन्ही गोष्टी घेणं शक्य होत नाही. तुम्ही घर किंवा कार घेणार असलात तर आनंदाची बातमी आहे. 'बँक ऑफ महाराष्ट्र'नं (Bank of Maharashtra) खास मान्सून ऑफर (Monsoon Offer) सुरू केलीय. या ऑफरनुसार ग्राहकांना गृह कर्ज आणि कारच्या कर्जाचे व्याज दर कमी केले आहेत. तुम्ही महाराष्ट्र बँकेचे खातेदार असाल तर तुम्हीही बँकेतून कर्ज घेऊ शकता. या मान्सून ऑफरमधील कमी व्याजदरांमध्ये तुम्ही कर्ज घेतलंत तर तुमचं घराचं स्वप्नही पूर्ण होईल आणि तुमचे पैसेही वाचतील. काय आहे ऑफर? 'बँक ऑफ महाराष्ट्र'नं 1 ऑगस्ट 2022 पासून ‘रिटेल बोनान्झा-मान्सून धमाका’ (Retail Bonanza-Monsoon Dhamaka) ऑफर सुरू केली आहे. बँकेनं त्यांच्या महासुपर गृह कर्ज आणि महासुपर कार कर्ज या योजनांसाठी प्रोसेसिंग फी (Processing Fees) घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आता PAN Card वरही घेऊ शकता पर्सनल लोन; अगदी सोपी आहे प्रक्रिया, लक्षात ठेवा फक्त ही एक अट सणासुदीच्या दिवसात ग्राहकांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने अनेक विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या योजनेअतंर्गत बँक आता 7.30 टक्के वार्षिक व्याज दराने गृह कर्ज तर 7.70 टक्के दराने कार कर्ज देऊ केलं आहे. रिटेल प्रॉडक्ट्सबरोबर काही आकर्षक सुविधाही बँकेने दिल्या आहेत. ज्यात गृह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास तीन ईएमआय मोफत दिले जातील. तसंच कार आणि घराच्या एकूण रकमेच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्याची सुविधाही बँकेने उपलब्ध करून दिली आहे. याहून विशेष म्हणजे या योजनेतून कर्ज घेणाऱ्यांसाठी कोणताही पार्ट टाइम चार्ज (No part time charge), प्री-क्लोजर चार्ज आणि प्री-पेमेंट चार्जही बँक आकारणार नाही असं बँकेनं जाहीर केलं आहे. सुवर्ण कर्जावरही फायदा बँक ऑफ महाराष्ट्रने गोल्ड लोन म्हणजेच सुवर्ण कर्जातही प्रोसेसिंग फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 3 लाख रुपयांपर्यंतची प्रोसेसिंग फी न भरताही ग्राहक 7.70 टक्के वार्षिक व्याज दराने 25 लाख रुपयांपर्यंत सुवर्ण कर्ज घेऊ शकतात. बँकेने आपल्या विविधा शाखांत ‘गोल्ड लोन पॉइंट’ ही विशेष काउंटर सुरू केली असून या काउंटरच्या माध्यमातून ग्राहकांना 15 मिनिटांत गोल्ड लोन घेता येणार आहे. ऑनलाईन पेमेंट करताय? 3 वर्षांमध्ये 74 टक्के लोकांना पैसे मिळालेच नाही! 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे एमडी आणि सीईओ ए. एस. राजीव यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, ‘आम्ही आमच्या रिटेल ग्राहकांना अत्यंत आकर्षक व्याज दरांमध्ये कर्ज देत आहोत आणि ‘रिटेल बोनान्झा - मान्सून धमाका’ऑफर आमच्या ग्राहकांसाठी आयसिंग ऑन द केक असल्यासारखी आहे. या ऑफरमुळे ते सण-उत्सव आनंदाने साजरा करू शकतीलच त्याचबरोबर त्यांची आर्थिक बचतही करता येईल.’ बँक ऑफ महाराष्ट्रचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ए. बी. विजयकुमार म्हणाले की, ‘सध्या अनेक उत्सव सण आहेत त्या काळात आम्ही मान्सून धमाका ऑफरच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना कमी दरांत गृह आणि कार कर्ज देऊन एक आकर्षक भेटच देऊ इच्छितो. त्यामुळे ग्राहकांना गृह आणि कारच्या कर्जावर वार्षिक व्याजदर कमी मिळेलच त्याचबरोबर त्यांना कोणतीही प्रोसेसिंग फीही भरावी लागणार नाही.’
    First published:

    Tags: Home Loan, Loan

    पुढील बातम्या