'बँक ऑफ महाराष्ट्र'ची दिवाळी भेट, ग्राहकांना मिळणार ही मोठी सवलत

'बँक ऑफ महाराष्ट्र'ची दिवाळी भेट, ग्राहकांना मिळणार ही मोठी सवलत

बँक ऑफ महाराष्ट्र ने सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना भेट दिली आहे. आता या बँकेची होमलोन आणि ऑटोलोन स्वस्त होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : बँक ऑफ महाराष्ट्र ने सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना भेट दिली आहे. आता या बँकेची होमलोन आणि ऑटोलोन स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर काही बँकांनी कर्जावरचे व्याजदर कमी केले आहेत. याचाच फायदा बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना मिळणार आहे.

याआधी SBI म्हणजेच 'स्टेट बँक ऑफ इंडिया' ने ही गृहकर्ज आणि वाहनकर्जाच्या दरात कपात केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट म्हणजेच MCLR मध्ये कपात केली. आता हा दर 8.40 टक्के असेल. ही कपात 8 ऑक्टोबरपासून लागू झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर घटले आहेत.

(हेही वाचा : 'आमचे पैसे परत द्या', PMC बँकेच्या खातेदारांचा निर्मला सीतारामन यांना घेराव)

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांनी ग्राहकांना भेट दिली आहे. या बँकांचीही गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाली आहेत.

मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट म्हणजेच MCLR ची घोषणा बँका दर महिन्याला करत असतात. छोट्या बँकांच्या तुलनेत मोठ्या बँकांचा MCLR कमी असतो. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये जास्त रकमेचा फायदा मोठ्या बँकांना होतो. घराच्या कर्जासाठीचे व्याजदर साधारण MCLR च्या इतकेच असतात. आता MCLR कमी झाल्यामुळे होमलोनसाठीचे व्याजदरही कमी होतील.

===================================================================================

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागते'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 05:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading