मराठी बातम्या /बातम्या /मनी /

इलेक्ट्रिक कारसाठी बँक ऑफ महाराष्ट्र देतंय स्वस्तात लोन

इलेक्ट्रिक कारसाठी बँक ऑफ महाराष्ट्र देतंय स्वस्तात लोन

इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

तुमच्या आवडीची इलेक्ट्रिक कार आजच घरी आणा, पैशांचं टेन्शन नाही बँक ऑफ महाराष्ट्र देतंय खास लोन

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : प्रत्येकाला असं वाटत असतं आपलं घर असावं गाडी असावी आणि एक चांगलं आयुष्य आपल्याकडे असायला हवं. कार घ्यावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण किती दिवस अशी नुसतीच स्वप्न पाहात राहणार. आपलं हे स्वप्न आता सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. कसं ते काय विचारता बँक ऑफ महाराष्ट्र अगदी स्वस्त व्याजदरात कारसाठी लोन देत आहे.

कारसाठी लोन हवं बँक ऑफ महाराष्ट्र आहे ना

बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्या ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी खास लोन देत आहे. अगदी कमी व्याजदरात हे व्याज मिळत आहे. त्यामुळे आता कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं म्हणणं आहे.

कार लोनची काय आहेत वैशिष्ट्यं

कमी हप्ता आणि जास्त लोनसाठी यामध्ये तुम्हाला रक्कम मिळणार आहे. तुमच्या कर्जाचा मागोवा घेण्याची सोय यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी लागणार नाही. प्रीपेमेंट करण्यासाठी कोणताही दंड लागणार नाही. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहून कार लोन घेऊ शकता.

मला माझ्या कारवर लोन मिळेल का, त्यासाठी नेमकं काय करावं लागेल?

लोन ट्रान्सफर करताना तुम्ही केलीय का ही चूक, वेळीच सुधारा

कोणाला मिळणार सूट

कॉर्पोरेट पगार खाते धारक आणि विद्यमान गृहनिर्माण कर्जदारांसाठी व्याजदरात 0.25% सवलत

90% पर्यंत जास्तीत जास्त कर्ज मिळण्याची सोय

दररोज कमी होत जाणार्‍या शिल्लकीवर व्याज आकारले जाते

प्री-पेमेंट/प्री-क्लोजर/पार्ट पेमेंट यावर कोणतेही दंड शुल्क नाही

वेगानं प्रक्रिया पूर्ण करून मिळणार लोन

कारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का? काय सांगतो नियम

तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्घतीने कारसाठी लोन घेता येऊ शकतं. ऑनलाईन लोन घ्यायचं असेल तर बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया आणि डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला कार लोन मिळेल.

First published: