• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Bank of India स्वस्त दरात देतेय Home Loan आणि Vehicle Loan, वाचा काय आहे शेवटची तारीख

Bank of India स्वस्त दरात देतेय Home Loan आणि Vehicle Loan, वाचा काय आहे शेवटची तारीख

फेस्टिव सीझन मध्ये आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांच्या होम लोन आणि ऑटो लोन वर सूट देण्याची घोषणा आहे. सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने (Bank of India Loan Offer) आपल्या गृह कर्जावरील व्याजदर 0.35 टक्क्यांनी कमी केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात काहीतरी मोठी खरेदी (Festive Season Shopping) करण्याचा विचार अनेकांचा असतो. सणाच्या काळात घरं किंवा वाहनांची देखील खरेदी केली जाते. तुम्ही यावर्षी या फेस्टिव्ह सीझनमध्ये घर, फ्लॅट किंवा वाहन विकत घेण्याचा विचार करत असाल तर विविध बँका होम लोन आणि व्हेइकल लोनसाठी बंपर ऑफर्स (Home Loan and Vehicle loan offer during festive Season 2021) घेऊन आल्या आहेत. फेस्टिव सीझन मध्ये आणखी एका सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांच्या होम लोन आणि ऑटो लोन वर सूट देण्याची घोषणा आहे. सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने (Bank of India Loan Offer) आपल्या गृह कर्जावरील व्याजदर 0.35 टक्क्यांनी कमी केला आहे. याशिवाय बँकेने वाहन कर्जावरील व्याजदर 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, या कपातीनंतर बीओआयचा गृहकर्ज दर 6.50 टक्क्यांपासून सुरू होईल. पूर्वी हा दर 6.85 टक्के होता. त्याचबरोबर बँकेच्या वाहन कर्जावरील व्याजदर 7.35 वरून 6.85 टक्क्यांवर करण्यात आला आहे. वाचा-कंगाल पाकिस्‍तानला मोठा झटका! IMF आणि इम्रान खान सरकारमधील 'ही' चर्चा फिस्कटली बँक ऑफ इंडियाने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'आता आनंद दुप्पट होईल. आता बँक ऑफ इंडिया सोबत आनंदाचा सण साजरा करा. शून्य प्रोसेसिंग फीसह BOI स्टार होम लोन @ 6.5% आणि स्टार व्हेइकल लोन @ 6.85% मध्ये मिळवा. 8010968305 वर मिस्ड कॉल द्या. गृह कर्जासाठी, <HL> टाइप करुन 7669300024 या क्रमांकावर SMS पाठवा. वाहन कर्जासाठी <VL> टाइप करा आणि 7669300024 या क्रमांकावर SMS पाठवा.' बँकेने अशी माहिती दिली आहे की हा विशेष दर 18 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू असेल. नवीन कर्जासाठी आणि कर्जाचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना नवीन व्याज दर लागू होईल. बँकेने 31 डिसेंबर 2021 पर्यंत गृह आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: