बँक ऑफ इंडियाचा 'डॉ. आंबेडकर बिझनेस एक्सलन्स' पुरस्काराने गौरव
बँक ऑफ इंडियाचा 'डॉ. आंबेडकर बिझनेस एक्सलन्स' पुरस्काराने गौरव
BOI ने उत्कृष्ट कामगिरी आणि देशभरातील अनुसूचीत जातीतील उद्योजकांना मदतीसाठी उल्लेखनीय योगदान आणि अनुसूचित जातीतील उद्योजकांना सर्वाधिक कर्ज दिल्याबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला.
मुंबई, 20 एप्रिल : बँक ऑफ इंडिया (Bank of India) या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकेला 'डॉ. आंबेडकर बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स'ने गौरवण्यात आलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या उद्योजकांसाठी बँकेने भरीव योगदान दिलं आहे. या योगदानाची दखल घेऊन `Most Significant Lender Supporting SC Entrepreneurs’ या श्रेणीतील PSB मधील पहिला पुरस्कार बँकेला देण्यात आला.
BOI ने उत्कृष्ट कामगिरी आणि देशभरातील अनुसूचीत जातीतील उद्योजकांना मदतीसाठी उल्लेखनीय योगदान आणि अनुसूचित जातीतील उद्योजकांना सर्वाधिक कर्ज दिल्याबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला. हा प्रतिष्ठित पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्यावर, बँकेने आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, बँक ऑफ इंडिया भविष्यातही या समुदायाला सक्रियपणे निधी देऊन सक्षम करण्यासाठी आपली वचनबद्धता कायम ठेवेल.
बँक ऑफ इंडिया ही देशातील अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. बँकेच्या एकूण 4,293 शाखा आहेत ज्यात 29 परदेशातील शाखा आहेत. या शाखांचे नियंत्रण 50 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत केले जाते. BOI च्या मुंबई, अहमदाबाद आणि पुणे येथे सर्वाधिक शाखा आहेत.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.