मुंबई, 05 मे : देशाची दुसरी मोठी सरकारी बँक, बँक आॅफ बडोदा ( BOB )नं ग्राहकांना एका मोठा झटका दिलाय. बँक आॅफ बडोदानं शनिवारी ( 4 मे ) मार्डिनल काॅस्ट आॅफ लेंडिंग रेटमध्ये (MCLR ) 0.05 टक्के वाढ केलीय. ही वाढ 7 मेपासून लागू होईल. या वाढीनंतर एक वर्षांहून जास्त काळ कर्ज हवं असेल तर व्याज दर 8.25 टक्क्यांवरून 8.30 टक्के होईल. एक महिना ते तीन महिन्यांच्या काळात हा व्याज दर 8.35 टक्क्यांवरून 8.45 टक्के होईल. 6 महिन्यांच्या काळासाठी नवा व्याज दर 8.65 टक्के आणि एका वर्षासाठीचा नवा व्याज दर 8.70 टक्के होईल.
कुठल्याही कम्प्युटरवरून आधार कार्ड डाउनलोड करत असाल तर 'ही' काळजी घ्यायलाच हवी
काय असतं MCLR?
MCLR ला मार्जिनल काॅस्ट आॅफ लेंडिंग रेटही म्हटलं जातं. यात बँक आपल्याकडच्या फंडानुसार कर्जाचे दर ठरवते. यात वाढ झाली की बँकेतून घेचलेली सर्व प्रकारची कर्ज महाग होतात.
तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं खरं की खोटं? अशी टाळा फसवणूक
MCLRमध्ये वाढ झाली तर होतं नुकसान
MCLRमध्ये वाढ झाली तर सामान्य माणसाचं नुकसान होतं. त्याचं आधीचं कर्ज महाग होतं. त्यामुळे त्याला पहिल्यापेक्षा जास्त ईएमआय द्यावा लागतो.
'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊतांची माघार, 'सामना'तून सारवासारव
काय असतो रेपो रेट?
रेपो रेट असा असतो, ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. जेव्हा बँकांकडे फंड कमी होतो, तेव्हा त्या आरबीआयकडून पैसे घेतात. आरबीआयकडून मिळणारं कर्ज फिक्स्ड रेटवर मिळतं. यालाच रेपो रेट म्हटलं जातं. भारतीय रिझर्व्ह बँक दर तिमाहीनंतर हा रेपो रेट ठरवत असते.
काही दिवसांपूर्वी विजया बँक आणि देना बँक यांचं बँक आॅफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. आता नवी बातमी अशी येतेय की अजून काही बँकांचंही बँक आॅफ बडोदामध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यात पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया यांची नावं आहेत.
इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आता जास्त वेळ वाट पाहायला नको. त्यांनी आताच्या आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत हे विलीनीकरण सुरू होण्याचे संकेत दिलेत.
VIDEO: सत्ता आणि पैशांसाठी वाटेल त्या तडजोडी करणं दु:खदायक-अण्णा हजारे