नवी दिल्ली, 26 मार्च: क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. दरम्यान तुम्ही पब्लिक सेक्टरच्या बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता भीम, पेटीएम, पेजॅप, मोबिक्विक, फ्रीचार्ज सारख्या निवड यूपीआय अॅप्सवर बँक ऑफ बडोदाचा रुपे क्रेडिट कार्ड लाइव्ह झालंय. म्हणजेच आता तुम्ही तुमच्या बँक ऑफ बडोदाच्या रुपे क्रेडिट कार्डला या अॅप्शच्या यूपीआयशी लिंक करु शकता. असं केल्यानंतर तुम्ही कोणत्याही किराणा स्टोअर, हॉटेल्समध्ये क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करु शकणार आहात.
गेल्या वर्षी रुपे क्रेडिट कार्ड ऑन यूपीआय सुविधा सुरु करण्यात आली होती. आता तुम्ही शेजारच्या दुकानात स्कॅन करुन क्रेडिट कार्डने पेमेंट करु शकता. रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही केवळ मर्चेंट यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करुनच पेमेंट करु शकता. पी 2 पी पेमेंट करु शकत नाहीत. सध्या बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक ऑफ कॅनरा बँकच्या रुपे क्रेडिट कार्ड होल्डर्स आपले कार्ड भीम, पेटीएम, पेजॅप, मोबिक्विक, फ्रीचार्ज सारख्या निवडक यूपीआय अॅप्सशी लिंक करु शकतात.
Car Loan घ्यायचंय? जाणून घ्या किती असावी तुमची मिनिमम सॅलरी
BHIM, Paytm, Mobikwik, PayZapp, Freecharge यांसारख्या निवडक UPI अॅप्सवर 6 बँकांचे रुपे क्रेडिट लाइव्ह झाले आहे. भविष्यात, तुम्ही तुमचे RuPay क्रेडिट कार्ड इतर UPI अॅप्सशी देखील लिंक करू शकाल. सध्या, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँक रुपे क्रेडिट कार्डधारक UPI अॅप्स निवडण्यासाठी त्यांचे कार्ड लिंक करू शकतात.
प्रथम BHIM अॅप उघडा.
यानंतर लिंक केलेल्या बँक अकाउंटवर क्लिक करा.
आता + वर क्लिक केल्यावर Add Accountमध्ये बँक अकाउंट आणि क्रेडिट कार्ड असे 2 पर्याय ऑप्शन.
क्रेडिट कार्डवर क्लिक केल्यानंतर, संबंधित कार्डवर क्लिक केल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेल्या क्रेडिट कार्डची डिटेल येईल.
अब क्रेडिट कार्ड के अंतिम 6 अंक और वैलिडिटी डालें.
आता क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक आणि व्हॅलिडिटी टाका.
यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
UPI पिन तयार करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
आता मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करा आणि रुपे क्रेडिट कार्ड सिलेक्ट आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Credit card