मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ICICI सह या 3 बँकांनी सुरू केली खास सेवा! केवळ मोबाइल क्रमांकावरुन पाठवता येतील 1 लाख रुपये

ICICI सह या 3 बँकांनी सुरू केली खास सेवा! केवळ मोबाइल क्रमांकावरुन पाठवता येतील 1 लाख रुपये

कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी बहुतांश लोकं आर्थिक व्यवहार देखील घरबसल्या करत आहेत. गेल्या काही काळापासून डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये (Digital Transactions) वाढ झाली आहे. मात्र यातही मोठी रक्कम ट्रान्सफर करताना अनेकांना समस्या येत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 15 जुलै: कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी बहुतांश लोकं आर्थिक व्यवहार देखील घरबसल्या करत आहेत. गेल्या काही काळापासून डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये (Digital Transactions) वाढ झाली आहे. मात्र यातही मोठी रक्कम ट्रान्सफर करताना अनेकांना समस्या येत आहे. कारण डिजिटल पेमेंट अॅप त्यांच्या ग्राहकांना एका दिवसात ठराविक मर्यादेपर्यंतच पैसे ट्रान्सफर करण्याची मुभा देतात. तुम्हाला अशा समस्येचा सामना करावा लागला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा नातेवाईकांना केवळ मोबाइलच्या माध्यमातून 1 लाखापर्यंतची रक्कम पाठवता येईल आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि एअरटेल पेमेंट्स बँकेने (Airtel Payments Bank) पे टू कॉन्टॅक्ट (Pay to Contact) किंवा पे यूअर कॉन्टॅक्ट (Pay Your Contact) ही सेवा लाँच केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत तुम्ही मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून कुणालाही पैसे पाठवू शकता. आतापर्यंत यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी समोरच्याचे बँक अकाउंट डिटेल्स किंवा यूपीआय आयडी लागत असे. ही सेवा सुरू झाल्यानंतर त्याची आवश्यकता भासणार नाही. हे वाचा-नोकरी करणाऱ्यांना PNB देत आहे 3 लाखांचा लाभ, झिरो बॅलन्स असेल तरीही मिळतील पैसे कशाप्रकारे पाठवता येतील पैसे? -सर्वात आधी तुमच्या बँकेचे App सुरू करा. त्याठिकाणी Pay to Contact किंवा Pay Your Contact या पर्यायावर क्लिक करा -त्याठिकाणी मोबाइलमधील फोनबूक उघडा आणि ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो क्रमांक निवडा -यानंतर बँकेचं App स्वत:हून संबंधित काँटॅक्टचा यूपीआय अॅड्रेस शोधेल. मात्र याकरता सेंडरचा यूपीआय अॅड्रेस असणं आवश्यक आहे. -यानंतर अमाउंट आणि पासवर्ड टाका. अशाप्रकारे पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर होतील -बँकांच्या मते यूपीआयच्या नवीन सेवेमुळे पेमेंट दरम्यान यूपीआय आयडी किंवा बँक डिटेल्सची आवश्यकता नाही आहे -नवीन सेवेअंतर्गत कोटक महिंद्रा बँक त्यांच्या ग्राहकांना 50 हजार रुपये पाठवण्याची मुभा देत आहे -तर ICICI बँकेचे ग्राहक दररोज 1 लाख रुपये पाठवू शकतात.
First published:

Tags: Bank, Bank details, Icici bank

पुढील बातम्या