मुंबई, 11 जुलै : तुम्ही तुमचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवत असाल तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. सर्वसाधारणपणे बँकांच्या सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला फक्त 3.5 ते 5 टक्केच वर्षाला व्याज मिळतं. वाढत्या महागाईत तर सेव्हिंग अकाउंटमध्येच पैसे ठेवणं बरोबर नाही. तुम्ही विचारपूर्वक हेच पैसे सेव्हिंग अकाउंटशिवाय दुसऱ्या योजनेत गुंतवलेत तर त्याचं रिटर्न दुप्पट मिळेल.
काय करता येईल उपाय?
बचत खात्याप्रमाणे एक स्कीम म्युच्युअल फंडातही आहे. ती आहे लिक्विड फंड. लिक्विड फंड डेट म्युच्युअल फंड आहे. तो सरकारी सिक्युरिटीज, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर्स आणि दुसऱ्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतो. यात 91 दिवसांनी मॅच्युरिटी पिरियड असतो. म्हणजे यात धोका कमी असतो. अनेक चांगले फंड आहेत, त्यात वर्षाला 7.6 टक्के म्हणजे सेव्हिंग अकाउंटच्या दुप्पट मिळतायत.
लवकरच लागू होणार घरभाड्याचा कायदा, भाडेकरूंना मिळणार दिलासा
लिक्विड फंड्स जास्त फायदेशीर
कमी काळासाठी गुंतवणूक करणारे फंड लिक्विड मानले जातात. लिक्विड फंडाला मनी मार्केट फंडही म्हटलं जातं. लिक्विड फंडात काही दिवसांपासून काही आठवडे गुंतवणूक करणं शक्य असतं. जास्त पैसे मिळाले तर या फंडात टाकले जातात. या फंडांना एक्झिट लोड लागत नाही.
दिवाळीच्या सुट्टीत ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हे करा
लिक्विड फंडातून रक्कम त्वरित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. या फंडात तुम्ही थोड्या दिवसांकरता गुंतवणूक करू शकता. यातली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.
World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!
एका वर्षात चांगले रिटर्न देणारे फंड
फ्रँकलिन इंडिया लिक्विड फंड- 7.64%
एक्सिस लिक्विड फंड- 7.53%
रिलायन्स लिक्विड फंड- 7.53%
आदित्य बिर्ला सन लाइफ लिक्विड फंड- 7.48%
ICICI प्रुडेंशियल लिक्विड फंड- 7.45%
फंड निवडताना त्याचा इतिहास पाहूनच निवड करा. त्याची साइज किती आहे, काॅर्पस किती आहे, याचा अभ्यास करा.
VIDEO: पालघरमध्ये कोसळधार! रस्ता वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला