जाणून घ्या कोणत्या बँकांनी वाढवले आणि कमी केले EMI चे दर

एमसीएलआर वाढल्यामुळे घेतलेलं कर्ज महाग होतं आणि पहिल्यापेक्षा जास्त कर्जाचा हफ्ता द्यावा लागतो.

News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2018 03:55 PM IST

जाणून घ्या कोणत्या बँकांनी वाढवले आणि कमी केले EMI चे दर

नवी दिल्ली, ०२ डिसेंबर २०१८- वर्ष २०१८ संपायला आता काही दिवसच उरले आहेत. मात्र डिसेंबरच्या सुरुवातीला सरकारी बँकांप्रमाणेच काही खाजगी बँकांनी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये बदल केले आहेत. काही बँकांनी MCLR मध्ये वाढ केली आहे. तर काहींनी MCLR कमी केले आहेत. एमसीएलआरच्या वाढ आणि घटीचा परिणाम ईएमआयवर झाला आहे.


एमसीएलआर म्हणजे यावर बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयचा दर ठरतो. याच्यापेक्षा कमी दरात देशातील कोणतीच बँक कर्ज देऊ शकत नाही. एमसीएलआरचे दर वाढले तर आवास, ऑटो, खाजगी आणि इतर प्रकारचे कर्ज महाग होतात. कारण हे सर्वच एमसीएलआरवर अवलंबून आहे.Loading...
पीएनबीने वाढवले  नाही एमसीएलआर-


पंजाब नॅशनल बँकने आपले सध्याच्या एमसीएलआरमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. एक दिवस आणि एका महिन्यासाठी एमसीएलआर ८.१५ टक्के, तीन महिन्यांसाठी ८.२५ टक्के, सहा महिन्यांसाठी ८.४५ टक्के, एका वर्षासाठी ८.५० टक्के आणि तीन वर्षांसाठी ८.७० टक्के ठेवण्यात आला आहे.


या बँकांनी वाढवलं एमसीएलआर-


लक्ष्मी विलाक बँकेने एमसीएलआरला ०.०५ वरून ०.१५ टक्के वाढवले आहे. वाढलेले दर १ डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. यानंतर ग्राहकांना या बँकांतून कर्ज घेणं महाग पडणार आहे.


युनियन बँक ऑफ इंडियानेही एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यांचे नवे दर १ डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.


खाजगी बँक ICICI बँकेने एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यांचे नवे दर १ डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.


DCB बँकेने एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यांचे नवे दर सोमवार म्हणजे ३ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.


या बँकांनी घटवले दर-


कोट महिंद्रा या खाजगी बँकेने एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांनी घट केली आहे. त्यांचे नवे दर १ डिसेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.


एमसीएलआर वाढल्यामुळे होणारे नुकसान-


एमसीएलआर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. एमसीएलआर वाढल्यामुळे घेतलेलं कर्ज महाग होतं आणि पहिल्यापेक्षा जास्त कर्जाचा हफ्ता द्यावा लागतो. तर एमसीएलआरच्या दरात घट झाली तर कर्जाचा हफ्ताही कमी होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...