मराठी बातम्या /बातम्या /मनी /खूशखबर! या सरकारी बँकेत आहे नोकरीची संधी, 30 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

खूशखबर! या सरकारी बँकेत आहे नोकरीची संधी, 30 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या या बँकेत डिजिटल लेंडिंगसाठी नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या या बँकेत डिजिटल लेंडिंगसाठी नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या या बँकेत डिजिटल लेंडिंगसाठी नोकरभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: जर तुम्ही देखील बँकेत नोकरी करू इच्छित आहात तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये  (Bank of Baroda) नोकरीची संधी आहे. अनेक पदांसाठी BOB मध्ये नोकरभरती आहे. बँकेमध्ये डिजिटल लेंडिंग (Digital Lending) मध्ये व्हेकन्सी निघाली आहे. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. एकूण 13 पदांसाठी नोकरभरती होणार असून प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता निश्चित केली गेली आहे.

डिजिटल लेंडिंग संदर्भातील पदांवर होणार नोकरभरती

एकूण रिक्तपदं- 13

या पदांवर होणार नोकरभरती-

-डिजिटल रिस्क स्पेशलिस्ट (Digital Risk Specialist)

-लीड- डिजिटल बिझनेस पार्टनरशीप (Lead- Digital Business Partnerships)

-लीड- डिजिटल सेल्स (Lead Digital Sales)

-डिजिटल अनालेटिक्स स्पेशलिस्ट (Digital Analytics Specialist)

(हे वाचा-चांगला रिटर्न देणारी LIC ची बेस्ट योजना, रोज 160 रुपयांची बचत करून मिळवा 23 लाख)

-इनोव्हेशन अँड इमरजिंग टेक स्पेशलिस्ट (Innovation & Emerging Tech Specialist)

-डिजिटल जर्नी स्पेशलिस्ट (Digital Journey Specialist)

-डिजिटल सेल्स ऑफिसर (Digital Sales Officer)

-UI/UX Specialist

-टेस्टिंग स्पेशलिस्ट (Testing Specialist)

पात्रता- वरील प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा- 25 ते 45 वर्ष

महत्त्वपूर्ण तारखा

ऑनलाइन अर्ज भरण्यास या तारखेपासून झाली सुरुवात- 9 नोव्हेंबर 2020

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 30 नोव्हेंबर 2020

(हे वाचा-67 लाख पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! घरबसल्याच जमा करा जीवन प्रमाणपत्र)

अशाप्रकारे करा अर्ज

बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला या नोकरीसाठी लागणाऱ्या पात्रतेविषयी माहिती मिळेलच. याकरता अर्ज करण्यसाठी तुम्हाला बँकेची अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.co.in/careers.html वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाइन अर्ज करतानाच तुम्हाला बायोडेटा अपलोड करावा लागेल. अन्य कोणत्या मार्गांनी तुम्ही अर्ज केल्यास तो स्वीकारला जाणार नाही. अर्ज केल्यानंतर अर्जाची एक प्रिंट अवश्य तुमच्याजवळ ठेवा. महत्त्वाची बाब म्हणजे ही नोकरी 3 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर असणार आहे. यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट वाढवले जाऊ शकते.

अर्ज करण्यासाठी लागणारं शुल्क

अनारिक्षत, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क-  600 रुपये

SC, ST, PWD उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क-  100 रुपये

First published:

Tags: Money