मराठी बातम्या /बातम्या /मनी /Bank Holidays News: जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका, बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट

Bank Holidays News: जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका, बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांची पूर्ण लिस्ट

पुढच्या वर्षीचा पहिला महिना म्हणजे जानेवारी 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in January 2022) जाहीर केली आहे.

पुढच्या वर्षीचा पहिला महिना म्हणजे जानेवारी 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in January 2022) जाहीर केली आहे.

पुढच्या वर्षीचा पहिला महिना म्हणजे जानेवारी 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in January 2022) जाहीर केली आहे.

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढच्या वर्षीचा पहिला महिना म्हणजे जानेवारी 2022 च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in January 2022) जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्ही पुढच्या महिन्यातील कामांसाठी बँकेच्या शाखेत जाण्याआधी या बँक हॉलिडेजची (Bank Holidays List) यादी नक्की पाहा. या यादीनुसार जानेवारी 2022 मध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद राहणारेत.

जानेवारी 2022 मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण 11 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये (Bank Holidays in December) 4 सुट्ट्या रविवारी आहेत. यामध्ये अनेक सुट्टया जोडूनही येत आहेत. तुमच्या माहितीसाठी संपूर्ण देशातील बँका 14 बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List) या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होत नाहीत. ज्या राज्यात जो सण किंवा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिथे ती सुट्टी लागू होते. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

जानेवारी 2022 मधील Bank Holidays

चला जाणून घेऊया जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यांतील बँका कधी बंद राहतील? त्यामुळे पुढच्या महिन्याच्या सुट्टीच्या यादीनुसार तुमची बँकाशी निगडीत कामं वेळीच करून घ्या. ज्यामुळे तुमची गैरसोय होणार नाही.

तारीख दिवस सण

1 जानेवारी शनिवार (देशभर) नववर्षाचा दिवस

2 जानेवारी रविवार (देशभर) साप्ताहिक सुट्टी

3 जानेवारी सोमवार सिक्कीममधील नववर्ष आणि लासूंगची सुट्टी

4 जानेवारी मंगळवार सिक्कीममध्ये लासूंग सणाची सुट्टी असेल

9 जानेवारी रविवार (देशभर) गुरुगोविंदसिंग जयंती सुट्टी, साप्ताहिक सुट्टी

11 जानेवारी मंगळवार मिशनरी दिवस मिझोराम

12 जानेवारी बुधवार स्‍वामी विवेकानंद जयंती सुट्टी

14 जानेवारी शुक्रवार अनेक राज्यांतील मकर संक्रांत सुट्टी

15 जानेवारी शनिवार पोंगल आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडूत सुट्टी

16 जानेवारी रविवार (देशभर) साप्ताहिक सुट्टी

23 जानेवारी रविवार नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

25 जानेवारी मंगळवार राज्य स्थापना दिवस हिमाचल प्रदेश

26 जानेवारी बुधवार (देशभर) प्रजासत्ताक दिन

31 जानेवारी सोमवार आसाममध्ये

या सुट्ट्या माहीत झाल्याने तुम्हाला नियोजन करता येईल आणि तुमची बँकांची कामं खोळंबणार नाहीत.

First published:

Tags: Bank holidays, बँक