नवी दिल्ली, 25 एप्रिल: कोरोना विषाणूची दुसरी लाट (Second Wake of Coronavirus) देशात सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे यावर्षीचा मे महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा उच्चांक गाठेल. त्यामुळे देशात विविध ठिकाणी कोरोना विषाणूबाबतचे नियम आणखी कठोर केले जातील. या दरम्यान बॅंकाच्या कामकाजावरही याचा परिणाम होऊ शकतो. बँकांची एक संस्था असणाऱ्या एसएलबीएसने अनेक राज्यांत बँकांच्या कामकाजाचे तास कमी करण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे मे महिन्यात बँकांशी संबंधित आवश्यक कामं अडकून पडू शकतात. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन आपण बँकेतील कामं व्यवस्थापित केले पाहिजे.
सर्व राज्यांसाठी वेगवेगळे नियम
आरबीआयच्या वेबसाइटनुसार, मे महिन्यात (Bank Holidays List May 2021) एकूण 5 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. तथापि, आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्यांच्या यादीमध्ये काही सुट्ट्या अशा आहेत, ज्या संपूर्ण देशात एकाच वेळी साजऱ्या केल्या जात नाहीत. काही सुट्ट्या किंवा सण-उत्सव स्थानिक राज्य पातळीवर वेगवेगळ्या दिवशी साजऱ्या केल्या जातात. त्यामुळे सर्व राज्यांत 5 दिवसांची सुट्टी होणार नाही.
या दिवशी असणार बँका बंद
1 मे 2021 - हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही राज्यांच्या बँका बंद राहतील. यामध्ये कोलकाता, कोची, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, चेन्नई, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, गुवाहाटी, इम्फाल, बंगलुरू आणि बेलापूर अशा ठिकाणांचा समावेश आहे.
-7 मे 2021 या दिवशी Jumat-ul-Vida असल्यानं बँका बंद राहणार आहेत. यादिवशी रमझानचा शेवटचा जुम्मा नमाज अदा केला जाईल. यानिमित्ताने फक्त जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहणार आहेत.
- 13 मे 2021 रोजी Id-Ul-Fitr आहे. त्यामुळे बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम येथे या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
- 14 मे 2021- या दिवशी भगवान श्री परशुराम जयंती / रमझान-ईद / बसवा जयंती आणि अक्षय तृतीया एवढे सण आहेत. त्यामुळे या दिवशी बऱ्याच शहरातील बँका बंद राहणार आहेत.
- 26 मे 2021 रोजी बुद्ध पौर्णिमा असल्यानं आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची आणि शिमला आणि श्रीनगर याठिकाणी बँका बंद राहणार आहेत.
(हे वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, शेयर बाजार निच्चांक गाठणार?)
या व्यतिरिक्त 8 व 22 मे रोजी महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दिवशीही बँकांमध्ये कोणतीही कामं होणार नाहीत. त्याचबरोबर 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवार असल्यानं सर्व बँकाना साप्ताहिक सुट्टी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank holidays, Money